Home /News /viral /

अशी सासू हवी? लग्नाच्या दिवशी जावयाला दिलं अस्सं गिफ्ट की.. पाहा VIDEO

अशी सासू हवी? लग्नाच्या दिवशी जावयाला दिलं अस्सं गिफ्ट की.. पाहा VIDEO

लग्नात एक महिला नवऱ्यामुलाला गिफ्ट म्हणून रायफल देत असल्याचं दिसतंय. यावेळी लग्नात उपस्थित असलेले पाहुणेही आनंदात आरडाओरड करत असल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, कधीचा आहे याची News18 पुष्टी करत नाही.

  कराची, 27 नोव्हेंबर : लग्नसमारंभात वधू-वराला पाहुण्यांकडून काही ना काही भेटवस्तू रुपात दिलं जातं. पण कधी लग्नात चक्क AK-47 गिफ्ट म्हणून दिल्याचं ऐकलंय का? असा एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. लग्नात नवऱ्यामुलाला त्याच्या सासूने चक्क एके-47 गिफ्ट दिली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. हे प्रकरण पाकिस्तानमधलं असल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहणाऱ्या आदिल अहसान या ट्विटर युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने ट्विटरवर स्वत:ला तो समा टीव्हीचा पत्रकार असल्याचं म्हटलंय. व्हिडीओमध्ये, लग्नात एक महिला नवऱ्यामुलाला गिफ्ट म्हणून रायफल देत असल्याचं दिसतंय. यावेळी लग्नात उपस्थित असलेले पाहुणेही आनंदात आरडाओरड करतायेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, कधीचा आहे याची News18 पुष्टी करत नाही. (वाचा - ola ड्रायव्हर्सकडून अशी होतेय फसवणूक; ग्राहकांकडून घेतलं जातंय डबल भाडं) व्हिडीओतील पाहुण्यांच्या आरडाओरड वरून त्यांच्यासाठी ही मोठी गौरवाची बाब असल्याचचं कळतंय. या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या कमेंट येत असून, पाकिस्तानी लोक जगाच्या मागे जात असल्याचं अनेकांनी म्हटलंय. या व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी, संपूर्ण जग पुढे जात असताना पाकिस्तान अजूनही मध्ययुगीन काळात असल्याचं म्हटलं आहे.

  (वाचा - कृषी बिलाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश,आंदोलनादरम्यान तरुणाच्या स्टंटचा VIDEO VIRAL)

  दरम्यान, मागील वर्षी जानेवारीमध्ये पंतप्रधान इमरान खान यांनी अरबचे प्रिन्स फहाद बिन सुल्तान अब्दुल अजीजला (Fahd bin Sultan bin Abdul Aziz) गोल्ड प्लेटेड क्लानिशकोव रायफल आणि बुलेट गिफ्ट म्हणून दिली होती. (वाचा - VIDEO: समुद्रात गुंग होऊन पोहत होता तरुण,बाजुला होता 10 फूट भलामोठा शार्क आणि...) परंतु ती रायफल केवळ प्रदर्शनासाठी होती की, चालू स्थितीतील होती हे अद्याप समजू शकलेलं नाही.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Pakistan, Video viral, Wedding

  पुढील बातम्या