• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Garlic म्हणजे आलं! पाकिस्तानच्या मंत्र्यांचा नवा शोध, देशभरात खिल्ली; पाहा भन्नाट VIDEO

Garlic म्हणजे आलं! पाकिस्तानच्या मंत्र्यांचा नवा शोध, देशभरात खिल्ली; पाहा भन्नाट VIDEO

गार्लिक म्हणजेच अद्रक, असं विधान (Pakistan minister confused between garlic and ginger video goes viral) करणारे पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांची सोशल मीडियावर सध्या जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

 • Share this:
  लाहौर, 24 नोव्हेंबर: गार्लिक म्हणजेच अद्रक, असं विधान (Pakistan minister confused between garlic and ginger video goes viral) करणारे पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांची सोशल मीडियावर सध्या जोरदार खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी हे आपल्या वादग्रस्त आणि बेताल वक्तव्यामुळे नेहमीच (Known for controversial statements) चर्चेत असतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात त्यांना लसूण आणि आलं यातील फरक (Difference between garlic and ginger) कळत नसल्याचं दिसून आलं आहे. काय म्हणाले मंत्री? महागाईच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी बोलत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. त्यामध्ये ते कांदा आणि गार्लिक म्हणजेच आल्याची किंमत कमी झाल्याचं सांगतात. त्यावर आल्याच्या किंमती की लसणाच्या किंमती असा प्रश्न त्यांना उपस्थित विचारतात. मात्र तरीही आपली चूक त्यांच्या लक्षात येत नाही. गार्लिक म्हणजेच अद्रक असं ते वारंवार बोलत राहतात. वास्तविक हिंदी आणि इंग्रजीची सरमिळस झाल्यामुळे हा प्रकार घडण्याची शक्यता आहे. गार्लिक म्हणजे लसूण आणि अद्रक म्हणजे आलं. मात्र त्याच्या हिंदी आणि इंग्रजी नावात गोंधळ घातल्यामुळं मंत्रीमहोदयांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. हे वाचा- भर लग्नातून नवरदेवाला अटक, पोलिसांच्या गाडीमागे धावत राहिली वधू सोशल मीडियावर होतायत ट्रोल हा व्हिडिओ नायला इनायत नावाच्या एका पत्रकारानं ट्विट केला आहे. त्यावर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून मंत्रीमहोदयांची खिल्ली उडवण्यात आली आहे. वर्गात असा एक विद्यार्थी असतो, ज्याला हिंट तरी इशारा समजत नाही, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर गार्लिक आणि जिंजर यात कुणीही गोंधळू शकतं, असं म्हणत एका युजरनं मंत्र्यांना सावरून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
  Published by:desk news
  First published: