नवी दिल्ली, 20 डिसेंबर : एखादी चप्पल आपल्याला दुकानात आवडली पण ती खराब झाली तर त्याबदल्यात आपण दुसरी चप्पल पाहातो किंवा विषय सोडून देतो पण एका तरुणानं आपल्या पत्नीला आवडलेली चप्पल खराब निघाल्यानं दुकानदाराला थेट कोर्टात खेचल्याची घटना समोर आली आहे.
दुकानदारानं आपल्या पत्नीला खराब चपला दिल्याच्या रागातून त्याला थेट कोर्टात खेचलं आहे. महिलेनं एका दुकानात चपला घेतल्या आणि त्या घातल्यानंतर तुटल्या. याबाबत दुकानदाराशी चर्चा केली तेव्हा तो त्यातील एकही ऐकण्यास तयार नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने ग्राहक संरक्षण न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. पतीने ग्राहकांक संरक्षण न्यायालयात दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Husband of the year: Wife given damaged shoes, husband takes shopkeeper to court. 😄 pic.twitter.com/L8ljy5pTcz
पतीने आपल्या याचिकेत दावा केला आहे की त्याच्या पत्नीने कराची इथल्या तारिक रोडवर असलेल्या दुकानातून 1600 रुपये देऊन चपलांचा जोड विकत घेतला. काही दिवसांतच हा जोड तुटला. या प्रकऱणी पतीने दुकानदाराकडे तक्रार केली आणि त्याच्यासोबत चर्चा देखील करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकानदार कोणतीही गोष्ट ऐकून घेण्यासाठी तयार नव्हता. पतीनं अखेर दुकानदाराविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.
याचिका पाहिल्यानंतर कोर्टाने सुनावणीसाठी हे प्रकरण मान्य केले आणि या प्रकरणातील साक्षीदारांना समन्स बजावले. कोर्टानं दुकानदाराला दंड आकारला असून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.