Elec-widget

'आपल्याकडे अणुबॉम्ब पण...' पाकिस्तानी कॉमेडी शोमध्ये उडवली खिल्ली; पाहा VIDEO

'आपल्याकडे अणुबॉम्ब पण...' पाकिस्तानी कॉमेडी शोमध्ये उडवली खिल्ली; पाहा VIDEO

पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज आहे पण देशाची अवस्था कशी झाली आहे यावरून खिल्ली उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 02 डिसेंबर : पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातलं जातं यात काही नवीन नाही. त्यांच्याकडून वारंवार दहशतवादी कारवाया करण्यासाठी कार्यरत संघटनांना पाठबळ देण्याचे प्रकार घडतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात लढणाऱ्या देशांनीही अनेकदा पाकिस्तानला याबाबत समज दिली आहे. भारत-पाक सीमेवरदेखील कुरापती सुरुच असतात.

काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणु हल्ल्याची धमकीही दिली होती. आता पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज आहे पण देशाची अवस्था कशी झाली आहे यावरून खिल्ली उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानमधील एका कॉमेडी शोमध्ये त्यांच्याकडे असलेल्या अणुशक्तीवर उपहासात्मक टीका केली आहे. कॉमेडियन म्हणतो की, आपण अणु बॉम्ब तयार केला. आपण अण्वस्त्रसज्ज झालो. पण आपली ताकद असलेला बॉम्ब लपवून ठेवला आहे. त्यावर कापड टाकलं असून झाकून ठेवलं आहे. आपल्याकडे ताकद असूनही आपणच घाबरलो आहे.

अणुबॉम्ब असुनही आपल्याला कोणी भीत नाही. इतरांना विश्वास आहे की आपण अण्वस्त्रे वापरणार नाही. आपल्यावर इतकं कर्ज आहे की, हल्ला करायचं म्हटलं तरी आपल्याला एक फोन येतो. त्यानंतर आपलेच लोक म्हणतात बॉम्ब आत ठेवा पुन्हा कधीतरी चालवू असं कॉमेडियन म्हणाला आहे.

Loading...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर देशभरातील अनेक नेत्यांनी इम्रान खान यांना देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून सुनावले होते. आर्थिक संकटात देश सापडल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी कार्यालये, कामानिमित्त अधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी होणाऱ्या अनावश्यक खर्चावर मर्यादा घातली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pakistan
First Published: Dec 2, 2019 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...