Home /News /viral /

पाकमध्ये कोरोनाग्रस्तांसमोर डॉक्टर-नर्सने केला भांगडा, VIDEO VIRAL

पाकमध्ये कोरोनाग्रस्तांसमोर डॉक्टर-नर्सने केला भांगडा, VIDEO VIRAL

पाकिस्तानात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सनी केलेल्या भांगडा नृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    कराची, 17 एप्रिल : सध्या जगभरात कोरोनामुळे भीतीचं वातावरण आहे. जगातील अनेक देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसंच सर्वत्र आरोग्य  कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत. जीव धोक्यात टाकून कोरोना झालेल्या रुग्णांची सेवा करत आहेत. दरम्यान, या रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी डॉक्टर आणि नर्सनी चक्क हॉस्पिटलमध्ये भांगडा नृत्य केल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तिथला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गायक मुश्ताक अहमद चीना यांचे प्रसिद्ध गाणं चिट्टा चोलाचं म्युझिक वाजत आहे. सर्व कर्मचारी त्यावर भांगडा नृत्य करत आहेत. यावेळी रुग्णालयात असलेले कोरोना रुग्णही दिसतात. पाकिस्तानमध्ये गुरुवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 6919 इतकी झाली. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे तिथं 128 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 17 मृत्यू गेल्या 24 तासातले आहेत. तर 1645 रुग्ण बरे झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. हे वाचा : तबलिगी जमात नंतर रोहिंग्यामुळे कोरोना पसरण्याची भीती? गृहंमत्रालयाने दिला इशारा पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आतापर्यंत कोरोनाचे 3291 रुग्ण आढळले आहेत. तर सिंध प्रांतात 2008, खैबर पख्तूनख्वा 912, बलूचिस्तान 280, गिलगिट बाल्टिस्तान 237, इस्लामाबादमध्ये 145 रुग्ण आहेत. याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्येही 46 रुग्णांचा समावेश आहे. अश्रूंमार्फतही Coronavirus पसरतो का? काय सांगतात तज्ज्ञ? संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या