Home /News /viral /

VIDEO : अजब आंदोलन! जिम सुरू करण्यासाठी चक्क कपडे काढून रस्त्यावर उतरले तरुण आणि...

VIDEO : अजब आंदोलन! जिम सुरू करण्यासाठी चक्क कपडे काढून रस्त्यावर उतरले तरुण आणि...

कपडे न घालताच रस्त्यावर उतरले आंदोलनकर्ते, VIDEO पाहून डोक्यावर हात माराल.

    इस्लामाबाद, 19 जून : जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे गेले तीन महिने घरात बसलेल्या लोकांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळं आता चक्क लोकं रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. असाच प्रकार पाकिस्तानमध्ये घडला. पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर जिम, महाविद्यालये, शाळा, मॉल बंद करण्यात आले. मात्र आता लोकं जिम सुरू करण्यासाठी आंदोलन करत आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉडी बिल्डर तरूण कपडे काढून रस्त्यावर आंदोलनाला उभे राहिले आहेत. एवढेच नाही तर ते लोकांना आपली बॉडीही दाखवत आहेत. हा व्हिडीओ पत्रकार नायला इनायत यांनी शेअर केला आहे. वाचा-'आपण झोपलो की व्हायरस पण झोपतो'-पाकच्या नेत्याचं अजब वक्तव्य, VIDEO व्हायरल याआधी कॅलिफोर्नियातील लोकंही अशीच कपडे न घालता रस्त्यावर उतरली होती. सध्या सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी जिम बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिम सुरू झाल्या तर लोकं गर्दी करतील, यामुळं कोरोनाचा प्रसार होण्याचा धोकाही वाढू शकतो. वाचा-कोरोनानं केलं लखपती! क्वारंटाइनमध्ये TikTok व्हिडीओ बनवून 'हा' तरूण झाला स्टार दरम्यान, काही देशांमध्ये जिम सुरू करण्यात आला आहे. कॅलिफोर्नियातील या जिममध्ये प्रत्येकाला एक जागा दिली आहे. प्लॅस्टिकनं गुंडाळलेल्या या जागेत राहूनच लोकांना व्यायाम करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. याला प्लॅस्टिक वर्क आऊट पोड्स असं नाव देण्यात आलं होतं. वाचा-डोंगराच्या टोकावर उभा राहून मारायला गेला बॅक फ्लिप आणि..., थरकाप उडवणारा VIDEO मात्र पाकिस्तानमध्ये हे तरूण जिम सुरू करण्यासाठी रस्त्यावर उतरले असले तरी, वाढता रुग्णांचा आकडा पाहता. जिम सुरू होणार नसल्याचं दिसत आहे. वाचा-पार्सल चोरण्यासाठी आलेल्या चोरानं डिलिव्हरी बॉयला मारली मिठी, पुढे काय घडलं पाहा
    First published:

    Tags: Corona, Corona virus

    पुढील बातम्या