कराची, 08 जानेवारी : काही दिवसांपूर्वी गाड्यांच्या शर्यतीत शहामृग देखील धावत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा भररस्त्यात महामार्गावर शहामृग दुचाकी आणि चारचाकीला अडवत पुढे पळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या शहामृगाला नेमकं कुठे जायचं हे माहीत नसावं पण जायचं हे पक्क आहे आणि तो सुसाट वेगानं धावत सुटला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एक शहामृग महामार्गावर इतर गाड्यांना क्रॉस करून धावत सुटला आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये, प्राणीसंग्रहालयातून हा शहामृग पळाल्याची माहिती मिळाली आहे. अचानक रस्त्यावर आलेल्या शहामृगाला पाहून लोक घाबरून गेले आणि एकच गोंधळ उडाला. अनेक वेगात असलेल्या गाडी चालकांनी आपला स्पीड कमी केला. तर रस्त्यावर धावणाऱ्या या शहामृगाची माहिती तातडीनं वन विभागापर्यंत नागरिकांनी पोहोचवली.
Meanwhile an ostrich on roads of #Karachi. Having a free run. It’s real. pic.twitter.com/mR1UVgnpGr
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) January 7, 2021
Poor animal has no idea what to do. He ran from zoo. Later was rescued and was shifted back. As per news.
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) January 7, 2021
This is heart wrenching to see the poor beast on roads among speeding vehicles. :(
— Sia (@The_Desert_girl) January 8, 2021
हे वाचा-अखेर कंगना आणि तिची बहिणी पोलीस स्टेशनला पोहोचली, VIDEO
IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 31 हजारहून अधिक लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला आहे. शहामृग वाट मिळेल तिकडे पळत सुटल्यानं अनेक गाड्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक चालकांना वेग कमी करावा लागला तर काही दुचाकीस्वारांचा तर तोल जाता जाता वाचला आहे.
भरधाव गाड्या असल्या तरी शहामृगाला मात्र कोणतीच भीती वाटत नाही तो मात्र बिनधास्त सगळ्या गाड्यांच्या मधून वाट काढत पळत सुटला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.