नवी दिल्ली, 30 जून : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर
(Social Media Platform) रोज अनेक फोटो, व्हिडिओ शेअर केले जातात. त्यापैकी काही फोटो
(Photo) किंवा व्हिडिओ
(Video) जोरदार व्हायरल होतात. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन
(Optical Illusion) असलेले अनेक फोटो, चित्र
(Painting) सातत्यानं शेअर केले जातात. असे फोटो शेअर करताना नेटिझन्सला काही प्रश्न विचारले जातात. नेटिझन्सनी या प्रश्नांची अचूक उत्तरं देणं अपेक्षित असतं. ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो, चित्र शेअर करण्यामागं मनोरंजन, एकाग्रता, बुद्धिमत्ता यांची चाचणी घेणं आदी उद्देश असतात. तसंच या माध्यमातून समोरच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व
(Personality) कसं आहे, हे जाणून घेण्याचादेखील प्रयत्न केला जातो.
जेव्हा ऑप्टिकल इल्युजन असलेलं चित्र किंवा फोटो तुम्ही सर्वप्रथम पाहता, तेव्हा त्यावरील प्रतिक्रियेवरून तुमच्या व्यक्तिमत्त्वातले गुण-दोष समोर येतात. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्युजन असलेलं एक चित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल
(Viral) होत आहे. या चित्रात अनेक चित्र दडलेली आहेत. या चित्रातलं गूढ उलगडण्याचा प्रयत्न नेटिझन्स आपआपल्या कुवतीनुसार करत आहेत. तसंच यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या गुण वैशिष्ट्यांविषयीची माहिती समोर येते. या विषयीची माहिती `आज तक`ने दिली आहे.
सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनवर आधारित झाडाचं चित्र व्हायरल होत आहे. या चित्रात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. या गोष्टींचं गूढ उकलण्याचा प्रयत्न नेटिझन्स करताना दिसत आहेत. या ऑप्टिकल इल्युजनवर आधारित चित्रात एक झाड (Tree) दिसत असून या झाडाच्या खालच्या बाजूला खूप सारी मूळं
(Roots) दिसत आहेत. हे चित्र पाहताच काही लोकांची सर्वप्रथम नजर झाडावर खिळली तर काही लोकांची नजर मुळांवर खिळली. परंतु, काही लोकांना या चित्रात एक ओठ दिसला. झाड आणि त्याची मुळं ओठाच्या आकाराची असल्याचं चित्रात दिसून येत आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray Resign: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर कलाकारांच्या प्रतिक्रिया, काहींचा पाठिंबा तर काहींनी केलं ट्रोल
या चित्राच्या निरीक्षणावरून लोकांच्या व्यक्तिमत्त्वाची गुणवैशिष्ट्यं नोंदवण्यात आली आहेत. हे चित्र डोळ्यासमोर येताच तुमच्या नजरेनं सर्वप्रथम ओठ ठिपले असतील तर तुम्हाला कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाणं आवडतं. तसंच तुम्हाला कोणत्याही गोष्टीच्या तपशीलात खोलवर जायला आवडतं. तुमच्या व्यक्तिमत्त्वातले हे गुण या चित्राच्या निरीक्षणावरून दिसतात.

जर तुम्ही चित्र पाहताच तुमची नजर सर्वप्रथम झाडांच्या मुळाशी गेली असेल तर तुम्ही एक प्रगतीशील व्यक्ती आहात. तुम्हाला प्रत्येक कामात परफेक्शन
(Perfection) आवडतं. जर तुम्ही चित्र पाहताच तुमची नजर सर्वप्रथम झाडांवर गेली असेल तर तुमचं व्यक्तिमत्त्व महत्त्वाकांक्षी आहे. प्रत्येक गोष्ट परफेक्ट करणं तुम्हाला जास्त आवडतं, हे यातून दिसून येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.