नवी दिल्ली, 2 डिसेंबर : ऑप्टिकल इल्युजन चित्र, फोटो याद्वारे लोकांना असं आव्हान दिलं जातं, की त्यामुळे डोक्याला चालना देण्याशिवाय पर्याय राहत नाही. याचं कारण म्हणजे ऑप्टिकल इल्युजनमध्ये लपलेली व्यक्ती, गोष्ट, प्राणी आदी शोधण्याचं आव्हान दिल्यानंतर, ते पूर्ण करण्यासाठी डोकं कसोशीनं वापरावं लागतं. पण त्याचा फायदा तुम्हालाच होतो. या खेळामुळे मनोरंजनासोबतच चांगला टाईमपास तर होतोच, शिवाय बसल्या बसल्या डोक्याची आणि डोळ्यांची तीक्ष्णताही तपासता येते.
आता नुकतीचं ब्राइट साईटनं डोळ्यांना फसवणारं ऑप्टिकल इल्युजनचं एक चित्र प्रसिद्ध केलं आहे. ज्यामध्ये तीन मुलांचा चौथा साथीदार कुठेतरी गायब झाला आहे. ती मुलं साथीदार सापडत नसल्यामुळे गोंधळलेली दिसतात. आता तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्हीही या चित्रात लपलेला मुलांचा चौथा साथीदार शोधू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत. या 10 सेकंदात जर तुम्ही चित्रातील चौथा मुलगा शोधून स्वतःची नजर तीक्ष्ण असल्याचं सिद्ध करू शकता.
हेही वाचा - Optical Illusion : गार्डनमधील 'या' साध्या फोटोत लपलाय कुत्रा, तुम्ही त्याला शोधून दाखवणार का?
चित्रात नेमकं काय?
ब्राइट साइटने प्रसिद्ध केलेल्या या चित्रात तीन मुलं एकत्र उभी असलेली दिसत आहेत. या मुलांच्या हातामध्ये काठी असून ही मुलं चिंताग्रस्त असल्याचं दिसत आहे. कारण या मुलांचा चौथा साथीदार कुठेतरी बेपत्ता झाला. पण तो कुठे आहे, हे या मुलांना माहीत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही या मुलांना त्यांच्या हरवलेल्या मित्राच्या शोध घेण्यास मदत करू शकता. जर तुम्हाला चित्रातील चौथा चेहरा 10 सेकंदात सापडला, तर तुम्ही हे आव्हान पूर्ण करून स्वतःला जीनिअस असल्याचं सिद्ध करू शकाल.
चित्र उलटं करा
चित्रात तुम्ही फक्त तीन मुलं, सरंक्षक भिंत, घर आणि काही झाडं पाहू शकता. पण या चित्र काढलेल्या व्यक्तीनं चौथा चेहराही अशा प्रकारे चित्रात काढलाय की, तुम्हाला तो सहजासहजी दिसणार नाही. पण ज्यांचे डोकं शाबूत व नजर तीक्ष्ण आहे, अशा लोकांना तो चेहरा नक्की सापडेल. जर तुम्हाला हा चेहरा अद्याप सापडला नसेल, तर काळजी करू नका. तो चेहरा शोधण्यासाठी आम्ही तुमची मदत करू. चित्राच्या उजव्या बाजूला दिसणार्या संरक्षक भिंतीच्या वर तुम्हाला मातीसारखा गोळा दिसेल. हा गोळ नीट पाहिल्यावर त्यात एक मानवी चेहरा दिसू लागेल. जर तुम्हाला चित्र सरळ असताना हा चेहरा समजत नसेल, तर चित्र उलटे करा. चेहऱ्याचा आकार स्पष्ट दिसेल.
डोळ्यांना फसवणारी आव्हानं सोडवायला लोकांना आवडतं. याद्वारे लोक स्वतःची आयक्यु चाचणी करतात. त्यामुळेच ऑप्टिकल इल्युजनला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral news, Viral photo