Home /News /viral /

कुणाला दिसेल चेहरा, कुणाला झाड; पण या PHOTO मध्ये एक मुलगीही आहे पाहा तुम्हाला सापडतेय का

कुणाला दिसेल चेहरा, कुणाला झाड; पण या PHOTO मध्ये एक मुलगीही आहे पाहा तुम्हाला सापडतेय का

Optical Illusion: या फोटोत डोक्यावरील वाढलेले केस आणि वाढलेली दाढी असलेल्या एका ज्येष्ठाचा चेहरा दिसतो आहे, ज्यात एक मुलगीही लपली आहे.

दिल्ली, 30 जून: सध्या ऑप्टिकल इल्युजन फोटोंचा (Optical Illusion) ट्रेंड सुरू आहे. हे फोटो आपल्याला गोंधळवून टाकणारे आणि विचार करायला लावणारे असतात. कधीकधी एका फोटोत दुसरा फोटो दडलेला असतो, तो फोटो पाहिल्यानंतर त्यात आपण नेमकं काय पाहिलं, हे लक्षात येत नाही आणि आपला गोंधळ उडतो. ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोंमध्ये मानवी चेहरे (Human Faces), प्राणी, पक्षी असं काही ना काही दडलेलं असतं. एका फोटोत एकापेक्षा जास्त कलाकृती दडलेल्या असतील तर तुम्हाला दिसणारी कलाकृती तुमच्या मित्राला ओळखता येणार नाही. तसंच कदाचित तुमच्या मित्राला दिसलेली कलाकृती तुम्हाला ओळखता येणार नाही आणि गोंधळ उडेल. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media)झाला आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला एका मुलीचं चित्रं शोधायचं आहे. प्रथमदर्शनी एका ज्येष्ठ व्यक्तीचा चेहरा (Old Man Face) असलेल्या या कलाकृतीत एका मुलीचंदेखील चित्र आहे, त्याच मुलीचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे. राणा अर्शद नावाच्या व्यक्तीने टिकटॉकवर हा ऑप्टिकल इल्युजन असलेला फोटो शेअर केला आहे. तसंच त्यांच्या मित्रांना आणि फॉलोअर्सना त्या माणसाच्या चेहऱ्यात लपलेली मुलगी शोधण्यास सांगितलं आहे. हे वाचा - Optical Illusion : तुम्ही 'या' फोटोत काय नोटीस केलं?; तुमचं उत्तर म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वातील गुण असं म्हणतात की, जेव्हा आपले डोळे आपल्या मेंदूला माहिती पाठवतात, तेव्हा एखादी वास्तविकतेशी जुळत नसलेली गोष्ट समजण्यात डोळे कमी पडतात त्यामुळे मेंदूची फसगत होते. आता तुम्हीही तुमच्या मेंदूला या फोटोत लपलेली मुलगी शोधायला सांगा. नीट लक्ष देऊन त्या फोटोचं निरीक्षण केल्यास तुम्हाला त्या ज्येष्ठाच्या चेहऱ्यात मुलगी दिसेल. या फोटोत डोक्यावरील वाढलेले केस आणि वाढलेली दाढी असलेल्या एका ज्येष्ठाचा चेहरा दिसतोय. जरा निरीक्षण केल्यास त्याच्या डोक्यावरील केस हे सुकलेल्या झाडाच्या फांद्या असल्यासारखेही दिसतात. आता या फोटोतील व्यक्तीच्या डोळ्याजवळ, केसात नीट निरीक्षण करा. मुलगी (Girl) दिसतेय का कुठे? बरं तुम्ही शोधून दमला असाल आणि तरीही तुम्हाला मुलगी दिसत नसेल तर थांबा. आम्ही तुम्हाला सांगतो की, या कलाकृतीत मुलगी कुठे आहे ते. या फोटोत ज्येष्ठाच्या नाकाजवळ (Nose) नीट बघा. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्यामधे तुम्हाला मुलीचं डोकं दिसेल. तर नाकाच्या जागी पाठमोरी बसलेली मुलगी दिसेल. अजूनही नीट दिसली नसेल तर त्या फोटोचं एकाग्रतेने निरीक्षण करा, तुम्हाला तिथे मुलीची पाठमोरी आकृती नक्की दिसेल. हे वाचा - पोट दुखेल पण हसू आवरणार नाही; कधीच पाहिला नसेल इतका जबरदस्त Fashion Show Video तुम्हाला या फोटोतली मुलगी सापडली असेल तर तुमच्या भावंडांना किंवा मित्रांना हा फोटो पाठवा आणि त्यांना या फोटोतली मुलगी शोधायला सांगा.
First published:

Tags: Viral, Viral news, Viral photo

पुढील बातम्या