मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - फक्त महिलांनाच जमतंय पुरुषांना नाही; पाहा तुम्ही पूर्ण करू शकता का हे चॅलेंज

VIDEO - फक्त महिलांनाच जमतंय पुरुषांना नाही; पाहा तुम्ही पूर्ण करू शकता का हे चॅलेंज

सोशल मीडियावर एका अशा चॅलेंजचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जे फक्त महिलाच पूर्ण करत आहेत. कितीही प्रयत्न केले तरी पुरुषांना काही ते जमत नाही आहे.

सोशल मीडियावर एका अशा चॅलेंजचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जे फक्त महिलाच पूर्ण करत आहेत. कितीही प्रयत्न केले तरी पुरुषांना काही ते जमत नाही आहे.

सोशल मीडियावर एका अशा चॅलेंजचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जे फक्त महिलाच पूर्ण करत आहेत. कितीही प्रयत्न केले तरी पुरुषांना काही ते जमत नाही आहे.

    मुंबई, 06 जून : बऱ्याचदा महिलांना पुरुषांपेक्षा कमी समजलं जातं. म्हणजे भले महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवला तरी काही गोष्टी अशा आहेत, ज्या फक्त पुरुषच करू शकतात महिला नाही, असंच अनेकांना वाटतं. अशाच लोकांना चुकीचं ठरवणारा हा चॅलेंज. जे पूर्ण करण्याचं टॅलेंट फक्त महिलांकडेच आहे. कितीही प्रयत्न केले तरी पुरुषांना जे जमणारं नाही आहे (Challenge video viral). हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे  (Weird tricks that men cannot do). एक महिला सुरुवातीला एक कृती करून दाखवते आणि त्यानंतर ती इतरांनाही तसं करायला सांगते. बरेच महिला, पुरुष ही कृती करतात. पण तुम्ही व्हिडीओ पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. सर्व महिलांना ही कृती जमते. पण एकही पुरुष ती कृती करण्यात यशस्वी ठरत नाही. सर्व पुरुष फेल होतात. अगदी साधंसोपं चॅलेंज आहे, पण जे भल्याभल्या पुरुषांना जमलेलं नाही.  असं काहीच नाही जे आम्हाला जमणार नाही, असं म्हणणाऱ्या पुरुषांनी तर हे चॅलेंज नक्कीच घ्यायला हवं आणि ते पूर्णही करून दाखवायला हवं. आता असं या व्हिडीओत नेमकं चॅलेंज आहे तरी काय हे जाणून घेण्याची आणि ती प्रत्यक्षात करून पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. हे वाचा - OMG! चक्क श्वानाने बनवले Cookies; विश्वास बसत नाही तर पाहा हा Chef Dog चा Video व्हिडीओत पाहू शकता एक महिला भिंतीच्या दिशेने तोंड करून उभी राहते. सुरुवातीला ती भिंतीला टेकून उभी आहे. त्यानंतर दोन पावलं मागे जाते आणि कमरेत खाली वाकून आपलं डोकं भिंतीला टेकवते. त्यानंतर तिच्या शेजारी एक खुर्ची आहे ती खुर्ची ती आपल्या पोटाखालील जागेच्या दिशेने सरकवते. आपल्या दोन्ही हातांनी खुर्ची पकडून ती छातीजवळ आणते आणि खुर्चीसकट ती ताठ उभी राहते. आता यात काय इतकं कठीण आहे. किती सोपं चॅलेंज आहे हे. आम्ही अस्सं एका चुटकीत पूर्ण करून असं तुम्हालाही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटेल. पण हे चॅलेंज जितकं दिसतं तितकं सोपं नाही. तुम्ही व्हिडीओ पुढे पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की पुरुष जेव्हा या महिलेप्रमाणे कृती करतात तेव्हा ते छातीपर्यंत खुर्ची टेकवण्यात यशस्वी तर होतात पण नंतर ताठ उभे मात्र राहू शकत नाहीत. शेवटची कृती कोणत्याच पुरुषाला जमत नाही. महिला मात्र अगदी सहजरित्या हे चॅलेंज पूर्ण करताना दिसतात. हे वाचा - 'हा' फोटो खरा की खोटा?, व्यक्तीच्या शरीरावर मधमाशांनी तयार केलं पोळं; सोशल मीडियावर फोटोचीच चर्चा तरी तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल तर तुम्हीसुद्धा हे चॅलेंज स्वीकारा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींना, जवळच्या व्यक्तींनासुद्धा हे चॅलेंज द्या आणि यानंतर या चॅलेंजबाबत तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Social media viral, Viral, Viral videos

    पुढील बातम्या