तंत्रज्ञानामुळे व्हायरल गोष्टी जगाच्या कोणत्याही कोपर्यात सहज पोहोचतात. दररोज काही ना काही चित्रविचित्र गोष्टींचे व्हिडिओज, फोटोज व्हायरल होतच असतात. ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रम. ऑप्टिकल इल्युजनचे विविध खेळ लक्षवेधी ठरतात. चक्रावून टाकणारे हे फोटो, कोडी सोडवताना तुमच्या हुशारीचा आणि निरीक्षणशक्तीचा कस लागतो.
काही फोटोज तर तुमच्या जाणिवा, मानसिकता आणि संयमाची परीक्षा पाहतात. पण तुम्ही जर ही कोडी सोडवू शकलात, तर तुमचं कौतुक होतं. ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुमच्या मेंदूचा आणि डोळे यातला मेळ काहीसा बिघडतो. तुम्हाला जे दिसतं तेच तुमच्या मेंदूत घट्ट बसतं, यामुळे तुमची बुद्धी जे तुम्हाला खुणावते आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं.
सध्या असाच एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. या कोड्यात लपलाय एक इंग्लिश शब्द. हा शब्द शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ पाच सेकंदांचा अवधी आहे. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘डीएनए इंडिया’ने दिलं आहे.
तुमच्यासमोर बुद्धिबळाच्या पटासारखी मांडणी असणारा चौकोन आहे. यातले काळे आणि पांढरे चौकोन हे एकटक पाहिल्यास तुमच्या डोळ्यांसाठी अडचणीचं होतात. नजर भिरभिरते. परंतु, या छोट्या-छोट्या चौकोनांच्या मध्येच हा शब्द दडलेला आहे.
एकटक या शब्दाकडे पाहात राहिल्यास तुमच्या मेंदूवर आणि डोळ्यांवर नक्कीच ताण येईल. परंतु, ऑप्टिकल इल्युजनचे खेळ हे मेंदूला चालना देणारेच असतात. यासाठीच ते लोकप्रियही ठरताना दिसतात. यासाठी तुम्ही हे काळ्या-पांढर्या चौकोनांचं चित्र बारकाईने पाहणं आवश्यक आहे. कारण, प्रत्येक 10 माणसांमागे केवळ 2 माणसांनाच याचं उत्तर सापडलं आहे. हा ऑप्टिकल इल्युजनचा फोटो अगदी तरबेज नेटिझन्सनाही चकवतो आहे.
हेही वाचा - इस्त्रीवाला जोमात, नेटकरी कोमात; Desi Jugad Video पाहून बसेल धक्का
तुम्हाला उत्तर सापडलं आहे असं वाटत असतानाच तुम्ही पुन्हा गोंधळात पडाल. हा फोटो निश्चितपणे फसवा आहे. परंतु, खरं सांगायचं तर या फोटोत दडलेला इंग्लिश् शब्द हा अगदी तुमच्या नजरेसमोरच आहे. तुम्ही डोळ्यात तेल घालून पाहिलंत तर नक्कीच तुम्हाला उत्तर सापडेल. परंतु, ज्यांना उत्तर सापडलं नाही, त्यांनी काहीवेळ लक्षपूर्वक फोटोकडे पाहिल्यास नक्कीच यश मिळेल हे नक्की. ज्यांना हा शब्द सापडला त्यांचं अभिनंदन. मेंदूला चालना देणारे विविध ऑनलाईन गेम्स आपण खेळतो. त्यापैकीच हे ऑप्टिकल इल्युजनचे खेळ आहेत. निरीक्षणदृष्टी आणि बुद्धीचा वापर केल्यास ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रातून कुठलीही वस्तू शोधणं अवघड नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral news, Viral photo