रिक्षावाल्याची भविष्यवाणी! बाजारात वापरलं जातंय रुपयाला मागे टाकणारं चलन; VIDEO VIRAL

रिक्षावाल्याची भविष्यवाणी! बाजारात वापरलं जातंय रुपयाला मागे टाकणारं चलन; VIDEO VIRAL

रुपयाही पडणार मागे, बाजारात वापरलं जाणार नवं चलन तुम्ही पाहिलत का?

  • Share this:

मुंबई, 05 डिसेंबर : कांद्याचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळं जेवणातही कांद्यांचा वापर केला जात नाही आहे. रोज वाढणाऱ्या कांद्यांच्या किंमतींमुळे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणले आहे. किरकोळ बाजारात कांद्याची किंमत प्रति किलो 100 रुपयांवर पोहोचली आहे. त्यानंतर सर्वसामान्यांच्या भाजीपाल्याचे बजेटही अडचणीत आले आहे. बरेच लोक, कोबी आणि मुळा अशा इतर स्वस्त भाज्यांचा वापर कांद्या ऐवजी करत आहेत.

कांद्यामुळे लोकांचे हाल होत असताना ट्विटर आणि टिक-टॉकवर मात्र मजेशीर व्हिडीओ शेअर केले जात आहे. एकीकडे कांद्या डोळ्यातून पाणी काढत असताना, आता हसून हसून लोकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

वाचा-VIDEO: भडकलेल्या कांद्याच्या प्रश्नावर आता गृहमंत्री अमित शहांनी बोलावली बैठक

असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रिक्षावालानं येत्या काळात देशात नवीन चलन येणार असल्याचे संकेत दिले. हा व्हिडिओ महाग कांद्याच्या किंमतीबद्दल बनविला गेला आहे. रिक्षातून उतरल्यानंतर, एक व्यक्ती रिक्षा चालकाला एक मोठा कांदा देतो, ऑटो ड्रायव्हर सुट्टीसाठी दोन लहान कांदे परत करतो. या व्हिडिओला 2 लाखाहून अधिक लाईक्स आहेत.

वाचा-इथं चक्क पाण्यावर तरंगतो 'राम' लिहिलेला दगड, Video व्हायरल

वाचा-'अब की बार' कांदा 150 पार, कशी होते कांद्याची लागवड? पाहा SPECIAL REPORT

याच धर्तीवर आणखी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका लग्नात चक्क आहेर म्हणून कांदा देण्यात आला. असा एक दिवस येईल जेव्हा कांदा हा सोन्याच्या भावानं विकला जाईल, अशा मजेशीर कमेंट यावर येत आहेत.

वाचा-अर्थमंत्री म्हणाल्या, 'मी कांदा खात नाही, त्यामुळे...'; व्हायरल होतोय Video

कांद्यावरून निर्मला सीतारमण होत आहेत ट्रोल

याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman)यांनी संसदेत केलेले वक्तव्य सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. अर्थमंत्री सीतारमण यांनी चर्चे दरम्यान कांद्याच्या वाढणाऱ्या किमतीमुळे मला वैयक्तीक पातळीवर काही फार पडत नाही. कारण माझ्या कुटुंबात कांदा आणि लसुण सारख्या गोष्टी फार आवडणी खाल्या जात नाहीत. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर #OnionPrice हा हॅशटॅग ट्रेंड मध्ये आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एनपीए आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न विचारला. सरकार इजिप्तमधून कांदा आयात करणार आहे. ही निश्चित चांगली बाब आहे. पण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. देशात कांद्याचे उत्पादन कमी का होत आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2019 04:27 PM IST

ताज्या बातम्या