मराठी बातम्या /बातम्या /Viral /

एका दिवसाचं 37 लाखांचं वीजबिल, पाहून चक्रावली महिला... नक्की काय आहे हा प्रकार?

एका दिवसाचं 37 लाखांचं वीजबिल, पाहून चक्रावली महिला... नक्की काय आहे हा प्रकार?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

महिलेच्या घरात दररोजच्या वापरातील सामान्य वीज उपकरणं आहेत. परंतु, तरीही इतकं बिल कसं आलं? असं महिलेला वाटलं...

मुंबई 06 ऑक्टोबर : वीजबिल वेळेत भरलं नाही तर काही दिवस वाट बघून नंतर महावितरणकडून वीज कनेक्शन तोडलं जातं. अनेकदा वीजबिलात तफावत दिसून येते. घरगुती वीज वापर असताना मीटरमध्ये भरमसाठ रीडिंग दाखवलं जातं अन् हजारो रुपये बिल येण्याचा प्रकारही घडत असतो. नंतर महावितरणच्या कार्यालयांमध्ये खेटे मारून बिलाची सेटलमेंट करावी लागते. परंतु, ब्रिटनमधील एका महिलेला तर चक्क एका दिवसांच वीजबिल 37 लाख रुपये आले. ते पाहून महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली.

एका दिवसाचं बिल 37 लाख रुपये येण्याचा हा प्रकार ब्रिटनमधील वेस्ट ससेक्स इथं घडलाय. मीडिया रिपोर्टप्रमाणे, भरमसाठ वीजबिल आलेल्या महिलेचं नाव माइल्स प्रायर असं आहे. वास्तवात या महिलेच्या घरी अनेक वर्षांपूर्वी वीज मीटर बसवण्यात आलं होतं. त्या महिलेला बऱ्याच काळापासून दररोज वीजबिल येतंय. महिलेच्या घरात दररोजच्या वापरातील सामान्य वीज उपकरणं आहेत. परंतु, तरीही इतकं बिल आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

एका दिवसाचं बिल साधारण दीडशे रुपये

ब्रिटनमधील या महिलेला एका दिवसाला सरासरी दीडशे रुपये बिल येत होतं. परंतु एके दिवशी महिलेने वीज मीटर पाहिले तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली. मीटरवर त्या महिलेला एका दिवसाचे बिल 37 लाख रुपयांपर्यंत दिसले. रीडिंग वाचून महिलेला धक्काच बसला. मीटरवर काहीतरी चूक असेल म्हणून तिनं ऑनलाइन जाऊन याची पडताळणी केली. परंतु तिथंही 37 लाखांचीच रक्कम दिसत होती.

वीज कंपनीशी संपर्क साधल्यानंतर मान्य केली चूक

एका दिवसाचे वीजबिल 37 लाखांपर्यंत येऊच कसे शकते, याची पडताळणी करण्यासाठी त्या महिलेनं वीज वितरण कंपनीकडे संपर्क साधला. वीज वितरण कंपनी ओवो एनर्जीनं या प्रकरणात चूक झाल्याचं मान्य केलं. मीटरमध्ये काहीतरी दोष असू शकतो, असं कंपनीनं म्हटलं. ज्या वीज ग्राहकांच्या बाबतीत वीज कंपन्यांकडून सदोष मीटर बसवण्यात आले त्यांना याबाबत कळवण्यात आलयं. यावर लवकरच निर्णय होईल, असं कंपनीनं म्हटलं.

दरम्यान, भारतात वीज वापरल्यानंतर ग्राहक बिलं थकवतात अशी तक्रार अनेकदा कंपनींकडून केली जाते. दुसरीकडे कंपनीही नीट वीज पुरवठा करत नाही. त्यामुळे अनेक जण सध्या सोलर पद्धतीने वीजनिर्मितीकडे वळत आहेत.

First published:

Tags: Marathi news, Shocking, Top trending, Viral news