मुंबई, 10 ऑगस्ट : महिलांची भांडणं तुमच्यासाठी नवी नाही. चाळीतला पाण्याचा सार्वजनिक नळ असो की मुंबईतील लोकल ट्रेन या ठिकाणी महिलांची भांडणं पाहायला मिळतातच. अगदी क्षुल्लक कारणावरून झालेली त्यांची भांडणं बर्याचदा हाणामारीपर्यंत पोहोचतात. असाच महिलांच्या फाईटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
3 महिलांची जबरदस्त फाईट झाली. एका रेस्टॉरंटमध्येच या तिघी भिडल्या. काही कारणेमुळे सुरुवातीला त्यांची बाचाबाची झाली. दोन महिला एका महिलेला अगदी तावातावाने बोलल्या. ती महिलाही तसं त्याला उत्तर देत होती. पण सुरुवातीला तिने शांतपणे घेतलं. नंतर तिच्या रागाचा पारा इतका चढला की ती आउट ऑफ कंट्रोल झाली आणि तिने एकटीने दोन्ही महिलांची धुलाई केली.
व्हिडीओत पाहू शकता दोन महिला एका महिले सोबत भांडत आहेत. तिच्यावर मोठमोठ्याने ओरडत आहेत. तिला रेस्टॉरंटमधून बाहेर जायला सांगत आहे. ती महिलाही त्यांच्याशी भांडते पण ती त्या महिलां सारखी आक्रमक होत नाही.
हे वाचा - लग्नात नवरदेवाचं कृत्य पाहून भडकली नवरीबाई, भरमंडपातच केली धुलाई; VIDEO VIRAL
काही वेळाने ती बॅग घेऊन तिथून निघू लागते. तेव्हा त्या महिला तिला असं काहीतरी बोलतात की ती भडकते. पुन्हा मागे येते आणि ती एकटीच त्या दोघींना जबरदस्त मारहाण करते. तिचं ते रूप पाहून सर्वजण हैराण होतात. ज्या महिला आधी तिच्याशी भांडत असतात त्यांचीही बोलती बंद होते. त्यासुद्धा तिच्याकडे पाहत राहतात.
— Vicious Videos (@ViciousVideos) August 8, 2022
महिला त्या दोघींना इतक्या भयंकर पद्धततीने मारते की पाहून आपल्यालाही धक्का बसतो. जणू ती प्रोफेशनल फाईट र आहे असा वार करताना दिसते. शेवटी रेस्टॉरंट मधील काही लोक आणि कर्मचारी तिला अडवतात आणि तिथून बाहेर नेतात. नाहीतर या महिलेने त्या महिलांचं काय केलं असतं सांगू शकत नाही.
हे वाचा - VIDEO - लेकाच्या दिशेने आला मृत्यू; सुपरहिरोसारखा अवघ्या एका सेकंदात बाबाने वाचवला जीव
@ViciousVideos ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बर्याच कमेंट्स येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos