नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर: आपल्या आजूबाजूला काहीवेळा अशा काही घटना घडत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असेही घडू शकते, याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. अशीच एक बाब समोर आली आहे. जी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका महिलेला वन नाईट स्टँड ( one night stand ) सेक्शुअल अॅक्टिव्हिटीदरम्यान ( sexual activity ) अचानक हृदयविकाराचा ( heart attack ) झटका आला. आजतक ने याबाबत वृत्त दिले आहे.
सेक्स केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक फायदे ( health benefits ) मिळतात, असा दावा अनेक अभ्यासातून करण्यात आला आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीवही धोक्यात येऊ शकतो. एका महिलेने ऑनलाइन वेबसाइट रेडिट ( Reddit ) वर वन नाईट स्टँड सेक्शुअल अॅक्टिव्हिटीदरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा- विचित्र! कुत्र्याचा पट्टा अडकवून पतीला शहरभर फिरवलं; कारण वाचून बसेल शॉक
'माझ्यासोबत यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. मला पॅनिक अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका आला आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण होते, नंतर मला अचानक आठवले की मी एक असे औषध घेत आहे ज्यामुळे हृदयाच्या समस्या वाढू शकतात. माझ्या हृदयाच्या गतीचे निरीक्षण करण्यासाठी, मी ऑगस्टमध्ये दोन ईसीजी देखील केल्या होत्या. ज्यामध्ये सर्व काही व्यवस्थित असल्याचे आढळले होते,' असे सांगतानाच ती महिला पुढे म्हणते, ‘चांगली गोष्ट म्हणजे त्यावेळी माझ्यासोबत हॉटेलच्या खोलीत असणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला समजून घेणारी होती. त्याने लगेच माझ्या कंबरेला मालिश करायला सुरूवात केली. त्याने मला शांत राहण्याचा सल्ला देत काय होत आहे, याबद्दल मला विचारपूस करण्यास सुरूवात केली. कित्येक तास आम्ही झोपलो नाही. पण नंतर अचानक वेदना कमी झाल्या आणि आराम वाटला. सकाळी आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि मग मी थेट डॉक्टरांकडे गेले.'
हेही वाचा- 5 लाखांत गाडीचं केलं घर, फिरत्या खोलीतून पूर्ण केली भटकंतीची हौस; पाहा VIDEO
सेक्स करणं हे आरोग्यासाठी, शरीरासाठी किती फायदेशीर आहे, हे वारंवार विविध अभ्यासातून सांगण्यात येते. तर केवळ मनोरंजनासाठी सेक्स केलं जातं, असेही काहींचे मत आहे. याबाबत तज्ज्ञांमध्ये विविध मतमतांतरे दिसतात. पण सेक्स करणे हे एका महिलेला चांगलेच महागात पडले असते, हे या प्रकारावरून समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heart Attack