Home /News /viral /

Oh...! लग्नाच्या स्टेजवर मेव्हणीनं सर्वांसमोर केलं नवरदेवाला किस; VIDEO VIRAL

Oh...! लग्नाच्या स्टेजवर मेव्हणीनं सर्वांसमोर केलं नवरदेवाला किस; VIDEO VIRAL

या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं आहे की, हे चुकीचं आहे, हाच प्रकार जर नवरदेवाने केला असता तर त्याला चपलेनं मारलं असतं.

  भारतीय लग्नपद्धतीत मजा-मस्तीबरोबरच थोडा खोडकरपणा केला जातो. भारतात लग्न हे असंच असतं. त्यात प्रत्येक राज्यानुसार त्या पद्धतींमध्येही बदल होतो. जिथे मेव्हणीची गोष्टी येथे तिथे मात्र मजा-मस्तीचा माहोल तयार होतो. येथे एका मेव्हणीने लग्नात केलेला प्रताप पाहून अनेकांची बोलती बंद झाली आहे. एका मेव्हणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मेव्हणीने बहिणीच्या लग्नादरम्यान चक्क नवरदेवाला किस करण्याचा प्रयत्न केला. इन्स्टाग्रामवर niranjanm87 यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लग्नसमारंभादरम्यान हार घालण्याचा कार्यक्रम सुरू होता. नवरदेव-नवरीने एकमेकांना हार घातले. ज्यानंतर स्टेजवर फोटो सेशन सुरू होते. नवरदेवाची मेव्हणी अगदी त्याच्या शेजारी चिकटून बसली होती. दरम्यान तिच्या मनात काहीतरी आलं, तिने नवरदेवाला पकडलं आणि सर्वांसमोर त्याला किस करू लागली. मेव्हणीचं हे कृत्य पाहून नवरदेव मात्र लाजेने पाणी पाणी झाला. हे ही वाचा-10 वर्षांपासून 'ती' शेजारच्या घरी क्वारंटाईन; आई-बाबांनाही नव्हती कल्पना
  हा प्रकार पाहून लग्नात आलेले पाहुणेही हैराण झाले. नवरदेवासोबत मेव्हणीने केलेल्या या खट्याळपणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर खूपजणं प्रतिक्रियाही देत आहे. एकाने तर हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. त्यात दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलं आहे की, हे चुकीचं आहे, हाच प्रकार जर नवरदेवाने केला असता तर त्याला चपलेनं मारलं असतं.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Marriage, Viral video.

  पुढील बातम्या