मराठी बातम्या /बातम्या /Viral /हनिमूनच्या दिवशी घरातून गायब झाला नवरदेव, पुढे जे झालं त्याची कोणीच केली नव्हती कल्पना

हनिमूनच्या दिवशी घरातून गायब झाला नवरदेव, पुढे जे झालं त्याची कोणीच केली नव्हती कल्पना

हनिमून

हनिमून

नवरी नवरदेवाच्या अनेक मजेशीर, विचित्र, हटके घटना समोर येत असतात. मात्र सध्या समोर आलेली घटना लग्नानंतरची असून हनिमूनदिवशी नवरदेव गायब झाल्याचं समोर आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : अनेक लग्न समारंभामधील अनेक मजेशीर फोटो व्हिडीओ समोर येत असतात. सोशल मीडियावर तर अनेक लग्नांची चर्चा पहायला मिळते. नवरी नवरदेवाच्या अनेक मजेशीर, विचित्र, हटके घटना समोर येत असतात. मात्र सध्या समोर आलेली घटना लग्नानंतरची असून हनिमूनदिवशी नवरदेव गायब झाल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातमीनुसार, उत्तर प्रदेशातील सैदनगरमध्ये लग्नानंतर हनिमूनच्या दिवशी वर अचानक घरातून गायब झाला. नवरदेव कुठे गेला आणि त्याला कशामुळे राग आला, अशी चिंता घरच्यांना लागली. आजूबाजूचे लोक त्याला शोधण्यासाठी गेले. घरातील लोकही रात्रभर त्याचा शोध घेत होते, मात्र सकाळी उजाडल्यावर त्याचा फोन सुरू होता, फोन केल्यावर तो शेजारच्या घरात लपून बसल्याचे कळले. हे जाणून सगळेच थक्क झाले. हनिमूनच्या दिवशी तो का पळून गेला हे लोकांना समजू शकले नाही.

View this post on Instagram

A post shared by memes comedy (@ghantaa)

अनेकवेळा विचारल्यावर नवरदेवाने सांगितले की हनिमूनच्या दिवशी लाजेमुळे रात्रभर घरी येण्याचे धाडस होत नव्हते. ही बातमी वाचल्यानंतर लोकांनी त्याची खिल्ली उडवली. या पेपरचे कटिंग मिम पेज घंटाने इंस्टाग्रामवर शेअर केले असून आतापर्यंत या पोस्टला 54 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. कमेंट बॉक्समध्ये लोक मजेशीर काही ना काही लिहित आहेत. एका यूजरने आपली प्रतिक्रिया देत लिहिले की, "या देशातील पोरांना काय झाले आहे, काही परीक्षेत चक्कर येऊन पडत आहेत तर काही त्यांच्या हनीमूनला पळून जात आहेत." दुसर्‍या युजरने लिहिले की, अरे देवा, मला असा नवरा देऊ नकोस.

दरम्यान, ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकजण नवरदेवाची मजा घेत आहेत. या पोस्टने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. यापूर्वीही अशा अनेक मजेशीर घटना घडल्याचं समोर आलं आहे. लग्नात आणि लग्नानंतर असे अनेक विचित्र प्रकार समोर येत असतात.

First published:

Tags: Marriage, Social media viral, Top trending, Viral, Viral news, Wedding