मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'ओह ओह जाने जाना...'वर आजोबांनी दाखवला आपला जलवा; Dance video पाहून शर्टलेस सल्लूलाही विसराल

'ओह ओह जाने जाना...'वर आजोबांनी दाखवला आपला जलवा; Dance video पाहून शर्टलेस सल्लूलाही विसराल

सलमान खानच्या गाण्यावर आजोबांनी दाखवला आपला जलवा.

सलमान खानच्या गाण्यावर आजोबांनी दाखवला आपला जलवा.

सलमान खानच्या गाण्यावर आजोबांनी दाखवला आपला जलवा.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 नोव्हेंबर : 'ओह ओह जाने जाना' (Oh Oh jane jaana song video) हे गाणं म्हटलं की सर्वात आधी समोर येतो तो शर्टलेस सल्लू (Salman khan shirtless song). या गाण्यातील सलमान खानच्या शर्टलेस लूकवर (Salman khan shirtless look) कितीतरी तरुणी आजही फिदा होतात. सलमानच्या याच गाण्यावर एका आजोबांनी (Old man dance video) आपला जलवा दाखवला आहे. या गाण्यावर वृद्ध व्यक्तीच्या (Old man dance on Oh oh jane jaana song) डान्सचा व्हिडीओ (Dance video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

सलमानच्या या गाण्यावर आजोबांचा डान्स पाहून तुम्ही शर्टलेस सलमानलाही विसराल. म्हणजे यापुढे तुम्ही हे गाणं ऐकलं की कदाचित तुम्हाला हे आजोबाच आठवतील.  व्हिडीओत पाहू शकता एक परदेशी व्यक्ती रस्त्यावर डान्स करतो आहे. त्याला नाचताना पाहून एक वृद्ध व्यक्तीही येते आणि त्यासोबत नाचू लागते.

व्हिडीओ ऐकाल तर त्यात सलमान खान आणि काजोल यांची प्यार किया तो डरना क्या या फिल्ममधील ओह ओह जाने जाने हे बॉलिवूड गाणं ऐकायलं मिळेल. या गाण्यावर परदेशी तरुण आपल्या डान्सच्या मुव्ह्ज दाखवत होता. पण त्याचवेळी आजोबांनी आपला जलवा दाखवला.

हे वाचा - ना Shaving razor रेझर, ना Trimmer; पठ्ठ्याने फक्त हातानेच केली हजामत; पाहा VIDEO

परदेशी तरुणाऐवजी सर्वांचं लक्ष आजोबांकडेच गेलं. किंबहुना त्या परदेशी डान्सरलाही आजोबांचा डान्स खूप आवडला. सुरुवातीला फ्री-स्टाईल करणारा हा डान्सर शेवटी आजोबांचा हात पकडून अभिवादन करतानाही दिसला. आजोबांनी इतका भारी डान्स केला आहे की, त्यांच्यासमोर आता या गाण्याची ओळख असलेला सलमान खानही फेल वाटू लागला आहे. आजोबांनी सल्लूलाही मागे टाकलं आहे.

sudhirdandotiya ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आजोबांचा हा अंदाज सर्वांना आवडला आहे. लगे रहो दादू, हे आमचे आजोबा, भारतीय आजोबा, अशा बऱ्याच कौतुकास्पद कमेंट या व्हिडीओवर येत आहेत.

हे वाचा - VIDEO- तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी त्याने छतावरून मारली उडी; भारी पडली हिरोगिरी

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.

First published:

Tags: Dance video, Viral, Viral videos