झाबुआ, 16 नोव्हेंबर : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) झाबुआ (Jhabua) जिल्ह्यात एका पोलीस (Police) अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये पोलीस ऑफिसर ड्यूटी दरम्यान शोले चित्रपटातील डाकू गब्बरचा डायलॉग मारत असल्यास दिसतंय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या पोलिसाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
केएल डांगी असं या व्हिडिओ व्हायरल झालेल्या पोलिसाचं नाव आहे. या पोलीस अधिकाऱ्याचा, 'कल्याणपुरा में 50-50 किलोमीटर की दूरी पर जब बच्चा रोता है तो मां कहती है चुप हो जा बेटा, नहीं तो डांगी आ जएगा' असं म्हणत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. व्हिडिओच्या सत्यता पडताळणीनंतर स्टेशन प्रभारी डांगी यांच्या अडचणीत वाढ होऊ शकत असल्याचं बोललं जात आहे.
(वाचा - जगातील सर्वात महागडा कबूतर; एवढ्याशा कबूतरची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल)
#WATCH | MP: KL Dangi, in-charge of Kalyanpura police station in Jhabua, says, "Kalyanpura se 50-50 km ki duri par jab bachcha rotaa hai to maa kehti hai chup ho ja beta nahi to Dangi aa jayega".
"A show-cause notice has been issued to him," says Jhabua ASP Anand Singh. (15.11) pic.twitter.com/FCEN0EKm8D
— ANI (@ANI) November 15, 2020
(वाचा - LIC ची जबरदस्त पॉलिसी! रोज गुंतवा केवळ 63 रूपये आणि मिळवा 7 लाख, वाचा सविस्तर)
डांगी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या प्रकरणी झाबुआ एएसपी आनंद सिंह यांनी सांगितलं की, केएल डांगी यांचा व्हिडिओ मिळाला आहे. व्हिडिओबाबत चौकशी सुरू आहे. तसंच केएल डांगी यांना कारणे दाखवा नोटिसही पाठवण्यात आली आहे.