Home /News /viral /

OMG! इवल्याशा हातांनी उडवलं भलंमोठं प्लेन, अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकल्याने घेतली आकाशात झेप; पाहा VIDEO

OMG! इवल्याशा हातांनी उडवलं भलंमोठं प्लेन, अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकल्याने घेतली आकाशात झेप; पाहा VIDEO

ज्या वयात सायकल चालवतानाही पडायला होतं, त्या वयात या चिमुकल्याने चक्क खरंखुरं विमान आकाशात उडवलं आहे.

    वॉशिंग्टन, 12 मे :  वय वर्षे फक्त 7 वर्षे... जे वय सामान्यपणे कागदी विमानं उडवण्याचं, खेळण्यातील विमानांशी खेळण्याचं असतं. पण या वयात एका चिमुकल्याने खरंखुरं विमान उडवलं आहे. आपल्या इवल्याशा हातात विमानाचा ताबा घेऊन त्याने आकाशात उंच झेप घेतली. या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एवढ्याशा चिमुकल्याची इतकी मोठी भरारी पाहून सर्वजण थक्क झाले आहेत (7 Year old boy flew airplane). विमान उडवणं वाटतं तितकं सोपं नाही. अगदी आपण सुरुवातीला सायकल शिकतो तेव्हाच किती तरी वेळा पडतो. असं असताना हा 7 वर्षांचा मुलगा मात्र विमान उडवतो आहे. जे नक्कीच वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी रितसर प्रशिक्षण घ्यावं लागतं. पण हा मुलगा अगदी प्रोफेशनल पायलट असावा अगदी तसं प्लेन उडवताना दिसतो. व्हिडीओत पाहू शकता एक मुलगा एका मिनी विमानत बसला आहे. तो अगदी लक्षपूर्वक विमान हँडल करतो आहे. शिवाय कंट्रोल रूमशीही तो बोलताना दिसतो. रन-वे वरून उड्डाण भरण्यापासून विमान लँड करणं सर्वकाही हा मुलगा करताना दिसतो. हे वाचा - OMG! चक्क माकडांनी सुसाट पळवली Bike; Rider Monkeys चा Video पाहून थक्क व्हाल पण त्याचवेळी त्याचा निरागसपणा ही दिसून येतो. कधी तो मध्येच हसतो, कधी तो मध्येच गुणगुणतो. विमान लँड झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे. 310 Pilot नावाच्या यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अमेरिकेच्या शिकागो ऑरोरा एअरपोर्टवरील हे दृश्य आहे. हे वाचा - SO SWEET! या पोपटाचं टॅलेंट पाहून सर्वजण झाले थक्क; एकदा पाहाच हा VIDEO वय वर्षे 18 पूर्ण झाल्याशिवाय आपण बाईक, कारही चालवू शकत नाही. मग या मुलाच्या हातात विमान कसं काय दिलं असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर हा मुलगा एकटा नाही. त्याच्यासोबत एक मोठी व्यक्तीही आहे. जी या मुलाला गाईड करत आहे आणि त्याच्यावर लक्षही ठेवत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Airplane, Small child, Viral, Viral videos

    पुढील बातम्या