पेट्रोल पंपावरच ओमनी व्हॅनला लागली आग, भिवंडीतील घटनेचा थरारक VIDEO

पेट्रोल पंपावरच ओमनी व्हॅनला लागली आग, भिवंडीतील घटनेचा थरारक VIDEO

भिवंडीतील (Bhiwandi) जुना मार्गावरील चवींद्रा गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर (Petrol Pump) गॅस भरल्यानंतर ओमनी कारला (Omni car) अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

  • Share this:

भिवंडी, 30 नोव्हेंबर :  भिवंडीतील (Bhiwandi) जुना मार्गावरील चवींद्रा गावाच्या हद्दीतील  पेट्रोल पंपावर (Petrol Pump) गॅस भरल्यानंतर ओमनी कारला (Omni car) अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत कार   जळून खाक झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, थोडक्यात पेट्रोल पंपावरील मोठी दुर्घटना टळली.

भिवंडी तालुक्यातील चवींद्रा गावात  हिंदुस्थान (एचपी)च्या  पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये सीएनजी गॅस भरण्याची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे, हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. अशातच आज दुपारच्या सुमाराला प्रवाशी वाहतूक करणारी ओमनी व्हॅन सीएनजी गॅस भरण्यासाठी आली. त्यावेळी व्हॅनमध्ये पंपावरील कर्मचाऱ्याने गॅस भरला आणि चालकाने व्हॅन पुढे घेण्यास सुरू करताच अचानक व्हॅनने पेट घेतला.

हे पाहून  पेट्रोल पंपावर एकच पळापळ झाली आणि पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी असलेल्या अग्नीरोधक तसेच काही यंत्रणांचा आगीवर वापर सुरू केला. तर  दुसरीकडे भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यालयात घटनेची माहिती मिळताच काही वेळातच अग्निशमनची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन अर्ध्यातासात आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मात्र, तोपर्यत ओमनी व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाली आहे.

कुटुंबातील लोक लग्न समारंभात गेले आणि घरातूनच बाळाचं अपहरण झालं

दरम्यान, कुठल्याही वाहनांत असलेल्या सीएनजी गॅसची टाकीची तपासणी करणे बंधनकारक असून ती अधिकृत दुकानातून द्यावी, असे शासनाचे नियम आहे. मात्र, भिवंडीसह इतरही शहरात याचे पालन न करताच एखाद्या गॅरेजवाल्याकडून सीएनजी गॅसची टाकी वाहनांत बसविण्यात येत असल्याचे अश्या आगीच्या दुर्घटना घडत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

Published by: sachin Salve
First published: November 30, 2020, 4:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या