मराठी बातम्या /बातम्या /Viral /सिनेमात नव्हे प्रत्यक्ष घडलं हे; प्रपोज केल्यावर होकार देताच प्रेयसी पाय घसरून कोसळली 650 फूट दरीत; पण....

सिनेमात नव्हे प्रत्यक्ष घडलं हे; प्रपोज केल्यावर होकार देताच प्रेयसी पाय घसरून कोसळली 650 फूट दरीत; पण....

प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी लोक अतरंगी प्रकार करतात. या पठ्ठ्याने डोंगरकड्यावर जाऊन प्रपोज केलं, पण तिथेच घात झाला. एखाद्या सिमेमात घडणाऱ्या चमत्कारासारखी, पण खरी गोष्ट तुम्हीच वाचा..

प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी लोक अतरंगी प्रकार करतात. या पठ्ठ्याने डोंगरकड्यावर जाऊन प्रपोज केलं, पण तिथेच घात झाला. एखाद्या सिमेमात घडणाऱ्या चमत्कारासारखी, पण खरी गोष्ट तुम्हीच वाचा..

प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी लोक अतरंगी प्रकार करतात. या पठ्ठ्याने डोंगरकड्यावर जाऊन प्रपोज केलं, पण तिथेच घात झाला. एखाद्या सिमेमात घडणाऱ्या चमत्कारासारखी, पण खरी गोष्ट तुम्हीच वाचा..

  व्हिएन्ना, 2 जानेवारी: आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा होकार मिळवण्यासाठी विविध पद्धतीने प्रपोज (Propose) करत असतात. आपल्या प्रेयसीच्या होकारासाठी काहीजण अगदी काहीही करायला तयार असतात. आपल्या जोडीदाराला प्रपोज करण्याच्या पद्धती देखील खूप विचित्र असतात. याआधी देखील तुम्ही अशी अनेक उदाहरणे पहिली असतील. आपल्या जोडीदाराला प्रपोज केलेला क्षण खास ठरण्यासाठी अशी कृत्य अनेकजण करत असतात. परंतु ऑस्ट्रियातील (Austria) एक असे प्रपोज प्रकरण आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

  प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी लोक अतरंगी प्रकार करतात. या पठ्ठ्याने डोंगरकड्यावर जाऊन प्रपोज केलं, पण तिथेच घात झाला. एखाद्या सिमेमात घडणाऱ्या चमत्कारासारखी, पण खरी गोष्ट तुम्हीच वाचा..

  ऑस्ट्रियामध्ये (Austria) एका तरुणाने एका युवतीला 650 फुटांवरील एका डोंगरकड्यावर रोमँटिकपणे प्रपोज केल्यानंतर तिनं लाजून ‘हो’ म्हटलं. पण त्यानंतर तिचा त्या उंच कड्यावरून पाय घसरून ती थेट 650 फूट दरीत कोसळली. तिला वाचवायला प्रियकरही धावला.

  याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रिया देशात कॅरिंथियामध्ये(Carinthia) ही घटना घडली आहे. येथील 27 वर्षीय युवकाने आपल्या 32 वर्षीय गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. मात्र, त्यानंतर ती पाय घसरून 650 फुटांवरुन कोसळली. 27 डिसेंबर रोजी ही युवती आपल्या बॉयफ्रेंड सोबत फॉल्कर्ट माऊंटनवर गेली होती. त्या ठिकाणी तिच्या बॉयफ्रेंडने तिला प्रपोज केलं. त्यानंतर काहीच वेळानंतर तिचा पाय घसरला आणि ती खाली कोसळली. परंतु या युवतीचे नशीब चांगलं असल्याने इतक्या उंचावरून पडूनही ती जिवंत राहिली. ती खाली कोसळल्यानंतर तिच्या प्रियकराने देखील तिला वाचवण्यासाठी खाली उडी मारली. पण तो 50 फूट खाली आल्यावर डोंगरातच अडकला. प्रेयसी थेट खाली बर्फावर पडली. नुकतीच बर्फवृष्टी झाल्याने भुसभुशीत बर्फ होता. त्यावरच ती पडली. त्यामुळे तिला फार लागलं नाही. त्यानंतर एका वाटसरूने तिला बर्फावर पडलेलं पाहिलं आणि प्रशासनास माहिती दिल्यानंतर तिचा जीव वाचला. सध्या युवती सुरक्षित असून तरुणाच्या मणक्याला मार लागला आहे.

  नव्या वर्षात माणुसकीचं मोठं उदाहरण! चष्मासाठी गरजूला दिले 500 डॉलर

  परंतु जगभरात असे कारनामे करणारे हे पहिलेच जोडपे नाही. याआधी देखील अनेकांनी असे कारनामे केले आहेत. गुजरातच्या डांग जिल्ह्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन सापुतारा(Saputara) येथे सप्टेंबरमध्ये सेल्फी क्लिक करतांना कड्यावरून पडून 48 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली होती. त्याचबरोबर केरळमधील एका व्यक्तीने आपल्या लग्नात वारंवार अडथळा आणत असल्याने शेजारील व्यक्तीचे दुकान जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त केलं होतं.

  OMG: हन नाही झालं जोडीदाराच्या विरहाचं दुःख; म्हणून त्यानं चक्क 'रेल रोको' केलं!

  केरळमध्ये (Keral) देखील अशीच घटना घडली होती. मल्याळम चित्रपट Ayyappanum Koshiyum मध्ये ज्या पद्धतीने नायक तक्रार करून देखील प्रशासन आपल्या तक्रारीची दखल घेत नसल्याने शत्रूच्या अर्धवट बांधलेल्या घरावर हल्ला करून ते जमीनदोस्त करतो असं दाखवलं आहे. ते पाहून केरळमधील अल्बिन मॅथ्यू याने देखील प्रशासनाने आपल्या तक्रारीची दखल न घेतल्याने कायदा हातात घेतला आणि त्याचा शेजारी सोजीच्या घरावर मध्यरात्री हल्ला केल्याची घटना घडली होती. भारताबरोबरच परदेशात देखील अशाच पद्धतीच्या घटना घडल्या आहेत. परंतु सगळ्याच घटना घातक ठरतात असंही नाही तर कधीतरी त्यातून गमतीजमतीपण घडू शकतात. आयर्लंडच्या डब्लिनमध्ये(Dublin) एका मोटरमनने आपल्या गर्लफ्रेंडला थेट रेल्वे स्टेशनवरच प्रपोज केलं होतं. या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने सोशल मीडियावर टाकल्यानंतर खूप लोकप्रिय झाला होता. अनेकांनी त्यांच्या या प्रपोजल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना त्यांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

  First published:
  top videos

   Tags: Viral