OMG! थरारक..अद्भुत..हिमाचलमधील अरुंद डोंगराळ रस्त्यावर बसचा यू-टर्न; VIDEO पाहून थक्क व्हाल

OMG! थरारक..अद्भुत..हिमाचलमधील अरुंद डोंगराळ रस्त्यावर बसचा यू-टर्न; VIDEO पाहून थक्क व्हाल

या व्हिडीओतल्या दृश्यात एक वेळ अशी येते, की बसची रस्त्यावरची पकड सुटतेय असं वाटतं पण...

  • Share this:

हिमाचल प्रदेश, 18 डिसेंबर : हिमाचल रोड ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशनच्या (HRTC) बसचालकाने (Bus -Driver) एखाद्या सुपरहिरोच्या स्टंटला (Stunt) शोभेल अशा पद्धतीने केलेल्या बस-ड्रायव्हिंगच्या कौशल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाला आहे. घाटातल्या अरुंद रस्त्याकडेच्या खोल दरीच्या अगदी काठावर असलेली बस यू-टर्न (U-Turn) घेऊन या चालकाने  पुन्हा व्यवस्थितपणे रस्त्यावर आणल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

चार मिनिटं 24 सेकंदांचा हा व्हिडीओ इन्क्रेडिबल हिमाचल (Incredible Himachal) या फेसबुक पेजवर 16 डिसेंबरला प्रसिद्ध झाला आहे. आतापर्यंत तो 35 हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ दूरवरून ज्यांनी चित्रित केला आहे, त्यांचे आश्चर्याचे, थरारल्याचे उद्गारही व्हिडीओत ऐकू येत आहेत.

या व्हिडीओतल्या दृश्यात एक वेळ अशी येते, की बसची रस्त्यावरची पकड सुटतेय असं वाटतं; पण प्रवाशांचे शर्थीचे प्रयत्न आणि ड्रायव्हरचा संयम, चिकाटी व जिद्द यांमुळे बस पुन्हा व्यवस्थितपणे रस्त्यावर आली. एकदा ही बस पुढच्या बाजूनेही अडकल्यासारखं वाटतं; मात्र ड्रायव्हरचे बस वळवण्याचे प्रयत्न अखेर यशस्वी झाले. या फेसबुक पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बहुतांश जणांनी ड्रायव्हरच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.

एका व्यक्तीने असं लिहिलं आहे - 'मी पाहिलेल्या अत्यंत उत्तम आणि शिस्तबद्ध ड्रायव्हर्सपैकी... मोठ्या शहरांतल्या ड्रायव्हर्सनी यांच्याकडून ड्रायव्हिंगचे मूलभूत नियम आणि तत्त्वं शिकून घ्यायला हवीत.' आणखी एका व्यक्तीनं असं लिहिलं आहे - गाडीतल्या प्रवाशांना काय वाटलं असेल? ते (ड्रायव्हर्स) नक्कीच सर्वोत्तम आहेत; पण त्या वेळी प्रवाशांच्या हृदयाचे ठोके किती वाढले असतील बरं? एका फेसबुक युझरने ड्रायव्हरला रिअल हिरो असं म्हटलं आहे. तसंच, त्याने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली, ते कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्या एकाने मात्र हा प्रसंग अत्यंत धोकादायक होता आणि जिवावार बेतणाराही ठरू शकला असता, असं म्हटलं आहे.

हिमाचल प्रदेशातले बहुतांश रस्ते डोंगराळ भागातूनच जातात. शिवाय त्यातले अनेक रस्ते पक्केही नाहीत. त्यामुळे मुळात त्या रस्त्यांवरून बस चालवणं हेच मुळी मोठ्या कौशल्याचं आणि हिमतीचं काम आहे. कारण एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी... असं दृश्य ड्रायव्हरला आणि त्या वेळी प्रवाशांनाही दिसत असतं. त्यामुळे प्रवाशांच्या पोटात गोळा आलेला असतो. या पार्श्वभूमीवर, ड्रायव्हरच्या केवळ कौशल्याचीच नव्हे, तर मानसिक क्षमतेचीही ती परीक्षा असते. त्यातच या ड्रायव्हरने तर त्या बिकट वाटेतच बसचा यू-टर्न घेऊन सुखरूपपणे बस रस्त्यावर आणली आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहतानाच अंगावर शहारे येत आहेत. त्यामुळे ड्रायव्हर, तसंच तिथे उपस्थित असलेल्या आणि बसमध्ये असलेल्या प्रवाशांच्या मनःस्थितीची केवळ कल्पनाच केलेली बरी.

Published by: Meenal Gangurde
First published: December 18, 2020, 10:16 PM IST

ताज्या बातम्या