Home /News /viral /

शक्य आहे? 100 किलो वजनाच्या नवरीसाठी 300 मुलींना नाकारलं, कुटुंबीयांच्याही भन्नाट अपेक्षा

शक्य आहे? 100 किलो वजनाच्या नवरीसाठी 300 मुलींना नाकारलं, कुटुंबीयांच्याही भन्नाट अपेक्षा

शौक अपना अपना! 100 किलो वजनाच्या नवरीसाठी 300 मुलींना नाकारलं

    22 जानेवारी: लग्नासाठी मुलांना स्लिम ड्रीम आणि दिसायला छान बायको हवी असते. मात्र एका तरुणानं लग्नासाठी अजब दावा केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील हल्क नावाने ओळखल्या जाणाऱ्या 27 वर्षीय तरुणाला चक्क 100 किलो ग्राम वजन असलेली बायको हवी आहे. अरबाब खिजर हयात असं या तरुणाचं नाव आहे. त्याला खान बाबा असंही तिथले स्थानिक लोकं म्हणतात. वेटलिफ्टर असलेल्या या तरुणाचं वजन जवळपास 444 किलोग्राम आहे. या तरुणानं आपल्या लग्नासाठी नवरी 100 किलोग्राम वजनाची शोधावी असा चंग बांधला आहे. त्यामुळे सगळेच जण आता या नवरदेवासाठी मुलगी शोधत आहेत. अरबाब खैबर पख्तूनख्वा जिल्ह्यातील मरदान परिसरातील रहिवासी आहे. 'माझ्या वडिलांची इच्छा आहे की मी लग्न करावं' त्यांना घरामध्ये नातवंडाचं तोंड पाहण्याची इच्छा आहे त्यामुळे ते लग्नासाठी माझ्या मागे लागले आहेत असं खैबर याने सांगितलं. मात्र आतापर्यंत 200 ते 300 स्थळं पाहूनही त्यातली एकही मुलगी मला पसंत नसल्याचंही त्याने सांगितलं. त्या सगळ्या मुली वजनाने कमी आहेत त्यामुळे मला त्यांच्यासोबत लग्न करायचं नाही. 'तरुणाची अट आहे की 100 किलो वजन असणाऱ्या मुलीसोबत मी लग्न करेन'. अरबाबा कुटुंबाच्या असलेल्या अटी तर आणखीनच अजब आहेत. नवरीची उंची 6 फूट उंच असवी. अरबाबाच्या उंचीला साजेशी असावी अशी त्यांची अट आहे. यासोबतच तिचं खाणं चांगलं असावं. अरबाब रोज 10 हजार किलो कॅलरी असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात करतो. याशिवाय रोज नाश्त्याला 36 अंडी खातो. जेवणात 4 कोंबड्यांचं चिकन आणि 5 लीटर दूध असा खुराक असतो. जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती होण्याचं त्याचं स्वप्न आहे. यासाठी त्यांनी आपल्या किशोरवयापासून सुरुवात केली. त्याला कोणताही आजार नाही. अपल्या भारदस्त वजनासह हयात एकदम फिट असल्याचंही सांगतो. ट्रॅक्टरला रस्सी बांधून ओढत नेत असतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अरबाब पहिल्यांना चर्चेचा विषय बनले. त्याचा दावा आहे की त्याने 2012 रोजी 5 हजार किलो वजन उचललं होतं त्याने WWF चं मेडलही मिळालं आहे आणि त्याचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आलं होतं असा दावा अरबाबने केला आहे. यावेळी मात्र त्याची अटक ऐकूनच तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. लग्नासाठी मुलांना नाजून आणि सुंदर मुलगी हवी असते. इथे मात्र अरबाबला 100 किलो वजनाची आणि भरपूर खाणारी बायको हवी आहे. याशिवाय त्याला आलेली 300 चांगली स्थळं नाकारल्यानंही सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या