OMG! जगातली सर्वात महाग हॅण्डबॅग पाहिलीत का? किंमत वाचून फुटेल घाम

OMG! जगातली सर्वात महाग हॅण्डबॅग पाहिलीत का? किंमत वाचून फुटेल घाम

या बॅगेची किंमत 6 मिलियन यूरो असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये 10 सोन्याची फुलपाखरं देखील लावण्यात आली आहेत.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी खास डोळ्यांसाठी एका कबुतराचा लिलाव करण्यात होता. त्यानंतर आता एक पर्स चर्चेचा विषय बनली आहे. खास डिझाइन केलेल्या या पर्सची किंमत ऐकून भल्याभल्यांना घाम फुटू शकतो. या एका पर्सच्या किंमतीमध्ये अनेक महागड्या गाड्या किंवा अलिशान बंगले येतील असा विचार देखील मनात डोकावून जाईल पण ही पर्स पाहिली तर यावर केलेलं नक्षीकाम आणि त्याचं मटेरियल याची किंमत अफाट आहे.

पर्स म्हटलं आणि त्यातही महाग म्हटलं तरी लाख दोन लाख किंवा 5 लाख असेल असा अंदाज साधारण असतो पण जगातली सर्वात महाग पर्स तयार करण्यात आली आहे. याची किंमत आहे 52 कोटी रुपये. ही किंमत ऐकून थक्क व्हायला होता. एका हॅण्डबॅगसारख्या पर्सची किंमत 52 कोटी बापरे! पण खरंच अशी पर्स तयार करण्यात आली आहे. या पर्सची जगभरात तुफान चर्चा देखील होत आहे.

Boarini Milanesi या इटालियन लग्झरी ब्रॅन्डच्या कंपनीने खास नक्षीकाम करत ही पर्स तयार केली आहे. त्यांनी या पर्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे.

हे वाचा-भयंकर! वाघांचा लोकांवर हल्ला, एका उडीत तरुणावर घातली झडप, पाहा थरारक VIDEO

या बॅगेची किंमत 6 मिलियन यूरो असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये 10 सोन्याची फुलपाखरं देखील लावण्यात आली आहेत. ही पर्स तयार करण्यासाठी साधारण 1000 तास लागल्याची माहिती देखील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या बॅगवर कमेंट्स देखील केल्या आहेत तर काही जणांना केवळ या बॅगेची किंमत ऐकून घाम फुटल्याचं पाहायला मिळालं आहे. ही पर्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 29, 2020, 9:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading