मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आधी कपड्यांना आग मग बाईकवरून स्टंट, पाहा जीवघेण्या स्टंटचा थरारक VIDEO

आधी कपड्यांना आग मग बाईकवरून स्टंट, पाहा जीवघेण्या स्टंटचा थरारक VIDEO

आधी बाईकस्वाराने आपल्या कपड्यांना आग लावली. त्यानंतर तलावात उडी घेतली. हा स्टंट पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

  • Published by:  Kranti Kanetkar
उन्नाव : अनेकदा जीवघेणे स्टंट करू नये असं आवाहन करूनही जीव धोक्यात घातला जातो. झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी बऱ्याचदा असे स्टंट केले जातात. मात्र एका तरुणाने तर अजबच स्टंट केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पाहणारेही चक्रावले आहेत. या तरुणाने आधी कपड्यांना आग लावली. त्यानंतर बाईकवर बसून त्याने तलावात उडी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. एखाद्या फिल्ममधील सीन वाटावा तसा हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. भयानक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आधी बाईकस्वाराने आपल्या कपड्यांना आग लावली. त्यानंतर तलावात उडी घेतली. हा स्टंट पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. युवकाचा हा स्टंट एवढा घातक आणि जीववर बेतणारा असू शकतो याची कोणालाही कल्पना नव्हती. या व्हायरल व्हिडीओनंतर पोलीस स्टंट करणाऱ्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्याची देखील काही दिग्गजांनी मागणी केली आहे. या तरुणाचा स्टंट पाहून इतर कोणीही असे धाडस करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. हा थरारक व्हिडीओ उत्तर प्रदेशातील उन्नाव भागातील असल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडीओवरून पोलीस स्टंट करणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहे.
First published:

Tags: Uttar pradesh, Viral video.

पुढील बातम्या