मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऐकावं ते नवलच ! रागाच्या भरात समोरच्याचं नाक चावलं, पुढं घडलं असं काही...

ऐकावं ते नवलच ! रागाच्या भरात समोरच्याचं नाक चावलं, पुढं घडलं असं काही...

रागात (Anger) कोण काय करेल, याचा काही भरवसा राहिला नाही. रागाच्या भरात एखादा अशी काही कृती करतो, जी ऐकल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटतं.

रागात (Anger) कोण काय करेल, याचा काही भरवसा राहिला नाही. रागाच्या भरात एखादा अशी काही कृती करतो, जी ऐकल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटतं.

रागात (Anger) कोण काय करेल, याचा काही भरवसा राहिला नाही. रागाच्या भरात एखादा अशी काही कृती करतो, जी ऐकल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटतं.

नवी दिल्ली :  रागात (Anger) कोण काय करेल, याचा काही भरवसा राहिला नाही. रागाच्या भरात एखादा अशी काही कृती करतो, जी ऐकल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटतं. तुम्हीही कदाचित अशा घटना ऐकल्या असतील. नुकताच सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला एक व्हिडिओही तुमच्या पाहण्यात आला असेल. ज्यामध्ये एकाने मुलीचा नंबर न मिळाल्याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने संपूर्ण रेस्टॉरंटची (Restaurant) तोडफोड केली होती. तसंच ऑर्डर योग्य न दिल्याने एका व्यक्तीने रेस्टॉरंटला आग लावली होती. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ती म्हणजे, रागाच्या भरात एका व्यक्तीने भांडणात समोरच्या व्यक्तीचा नाकाचा (Nose) चावाच घेतला. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने हा प्रकार केलाय, तो लोकांना मांसाहारापासून दूर ठेवणारे पदार्थ विकतो. तो स्वतः शाकाहारी आहे. रागाच्या भरात त्याला तो शाकाहारी असल्याचंही भान राहिलं नाही, आणि त्याने केवळ गोंधळच घातला नाही, तर समोरच्या व्यक्तीचं नाकही चावलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडणाच्या वेळी त्याने हे कृत्य रागाच्या भरात केलं. या प्रकारानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र, सोशल मीडियावर या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. नेमकं काय घडलं? बियॉन्ड मीट (Beyond Meat) नावाच्या कंपनीत चीफ ऑपरेशन्स ऑफिसर (COO) म्हणून काम करणाऱ्या डॉउग रॅमसे (Doug Ramsey) नावाच्या 53 वर्षीय व्यक्तीचा एका ड्रायव्हरशी वाद झाला. या ड्रायव्हरने रॅमसे यांच्या कारच्या पुढील टायरला धडक दिली होती. त्यानंतर रॅमसेला इतका राग आला की, त्याने ड्रायव्हरला विंडशील्डवर जोरदार धक्का दिला आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅमसेने नंतर रागाच्या भरात ड्रायव्हरच्या नाकाला चावा घेतला. या प्रकरणी रॅमसेला अमेरिकेतील अर्कान्सासमधून अटक करण्यात आली. ही संपूर्ण घटना 17 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता घडली. म्हणून सुरू झाली सोशल मीडियात चर्चा लॉस एंजेलिसमधली कंपनी बियॉन्ड मीटची स्थापना 2009 मध्ये झाली, ज्यामध्ये रॅमसे काम करतात. ही कंपनी ग्राहकांना मांसाहाराला पर्याय म्हणून वनस्पती-आधारित अन्न देते. अशा सात्विक कंपनीचे रॅमसे हे सीओओ असल्याचं जेव्हा ट्विटरवरील युजर्सना कळालं, तेव्हा त्यांनी रॅमसे व ड्रायव्हरच्या भांडणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं. rdfया घटनेची सोशल मीडिया युजर्सने खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. ‘हे मांसाहारी जेवणापेक्षा थोडं वेगळं आहे’, अशा कमेंटही काही युजर्सनी दिल्या.या प्रकाराची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू असून त्यावर युजर्सच्या मजेदार कमेंट्ससुद्धा येत आहेत.
First published:

Tags: Photo viral, Viral news

पुढील बातम्या