Home /News /viral /

LIVE रिपोर्टिंग करताना पत्रकार घाबरली, असं काय घडलं पाहा VIDEO

LIVE रिपोर्टिंग करताना पत्रकार घाबरली, असं काय घडलं पाहा VIDEO

    मुंबई, 11 सप्टेंबर : पत्रकारिता हे असे काम आहे, ज्यात सदैव सजग आणि आपले डोळे आणि कान उघडे ठेवावे लागतात, कारण कुठून आणि कधी कशी बातमी मिळेल याचा नेम नाही. पण कॅनडात टीव्हीवर लाईव्ह वार्तांकन करताना एका अनोखा प्रकार घडल्याचं समोर आलं. पत्रकार शैली स्टीव्हज ह्या टीव्हीवर वार्तांकन करत असताना अचानक त्यांच्या अंगावर पाणी उडालं. दोन मिनिटांसाठी त्यांना नेमकं काय घडलंय हे समजलं नाही. शैली जेव्हा वार्तांकनात मग्न होत्या त्याच वेळी शेतात पाणी देत असलेलं स्पिंकलरसारखं मशीन फिरत असताना अचानक पाण्याचे फवारे त्यांच्यावर उडाले. लाईव्ह टीव्ही शोमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. वर्तांकन करताना अचानक अंगावर पाण्याचे फवारे आल्यामुळे त्या इतक्या घाबरल्या की कॅमेरा चालू आहे याचा त्यांना एक क्षण विसर पडला आणि त्या कॅमेऱ्यापासून दूर पळून गेल्या. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-VIDEO: पाण्यात पाय टाकताच समोर होता 14 फूटी लांब शार्क आणि... "पत्रकाराने नेहमी सजग राहावे' असं caption असलेला हा व्हिडीओ ग्लोबल न्यूज चॅनलने स्वतःच्या फेसबुक पेजवर शेअर केला. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर 300 हून अधिक लाईक्स आले असून अनेक लोकांनी याला रिशेअर देखील केला. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर फेसबुकवर गमतीदार कमेंट्सचा ओघ सुरू झाला. त्यामध्ये एक युजरने लिहले आहे कि ' मी आशा करतो हे पाणी आहे खत नाही, तर दुसरा युझर म्हणतो की, कॅमेरा चालवणारा काय फवाऱ्याला टाटा करण्यासाठी उभा आहे काय ? तर एकाने म्हटले कि, व्हिडीओ इतका मजेदार आहे की मी माझे हसणे थांबवूच शकत नाही. हे वाचा-झूमवर क्लास सुरू असतानाच तरुणीच्या घरात घुसले चोर, लॅपटॉप बंद केला आणि..., व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. त्यामुळे मजेशीर व्हिडीओ पाहण्याची ज्या कोणाला आवड असेल त्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा. कारण हा व्हिडीओ पाहिल्यावर पाहणारा एक तर आश्चर्यचकित होतो किंवा त्याला आपले हसू आवरणार नाही.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या