नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : अस्वलाला ओरडताना कधी पाहिलं आहे का? आपल्याला फक्त अस्वल खेळताना, चढता किंवा चोरी करतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. पण सोशल मीडियावर सध्या विचित्र आवाज काढणाऱ्या अस्वलाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ USA च्या नॅशनल पार्कमधील असल्याचं सांगितलं जात आहे.
काळ्या रंगाच्या अस्वलानं झाडावर चढून विचित्र आवाज काढले आहेत. वेगवेगळ्या आवाजात हे अस्वल ओरडत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप वेगवान व्हायरल होत आहे. नॅशनल पार्कने गुरुवारी अस्वलाच्या या विचित्र आवाजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. जेव्हा अस्वलाला भीती वाटते किंवा स्वत:चं संरक्षण करण्यासाठी किंवा घाबरलेला किंवा चिडलेला असतो तेव्हा वेगवेगळ्या आवाजात तो ओरडतो. या अस्वलासोबत नेमकं काय घडलं असाव आणि तो असे विचित्र आवाज का काढतोय याबाबत अद्याप उद्यानातून कोणतीही माहिती समोर आली नाही.
Sound on!
Check out this video of an adult male black bear vocalizing in a tree! Bears can produce a wide repertoire of sounds, typically when defensive, afraid, distressed, or aggressive. We're not sure what prompted this unscheduled a capella concert...#KeepBearsWildpic.twitter.com/2PZZtUHJHs
Sounds like a scared worried bear I hope they backed off with the camera & people and gave him some space. Check out North American Bear Center for great videos and info on Blk Bear #KeepBearsWild
हा व्हिडीओ 16 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. 20 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 290 लोकांनी रिट्वीट केला आहे. काही युझर्सनी हे अस्वल घाबरल्यामुळे किंवा त्याला मदत हवी असेल म्हणून असं ओरडत आहे असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. 50 वर्षांहून अधिक अस्वलाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी हे अस्वल काळजीत किंवा त्याला काहीतरी चिंता असल्यानं असा ओरडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.