नवी दिल्ली, 17 मार्च : आई होणं हे सुख जगातील इतर कोणत्याही सुखांपेक्षा मोठं असतं. जेवढा मोठा आनंद त्यामागे त्रासही तेवढाच सहन करावा लागतो. मुल झाल्यावर जबाबदारीही वाढतात. त्यामुळे आजकाल महिला एकच मुलगा किंवा मुलीवर थांबतात. या महागाईच्या जगात त्यांना शिकवणे, त्यांच्या गरजा भागवणे अवघड झाले आहे. अशातच एका महिलेने 28 व्या वर्षी 9 मुलांना जन्म दिल्याची घटना चर्चेत आली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
एका महिलेने 28 व्या वर्षापर्यंत 9 मुलांना जन्म दिल्याचं समोर आलं आहे. ही महिला अमेरिकेतील लास वेगासमध्ये राहते आणि तिचं नाव कोरा ड्यूक आहे. कोरा 39 वर्षाची असून तिच्या 42 वर्षीय पती आंद्रे ड्यूकसोबत राहते. आजकाल ती सोशल मीडियावर चर्चेत आहे कारण वयाच्या 28 व्या वर्षी तिला 9 मुले आहेत. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे ती सलग 10 वर्षे गर्भवती होती. आजच्या काळात जिथे मुले झाल्यानंतर महिलांना त्यांच्या फिगरची काळजी वाटते, अनेकवेळा त्यांना आई व्हायचे नसते, तर दुसरीकडे 9 मुले असूनही कोराने तिची फिगर चांगली राखली आहे.
View this post on Instagram
कोरा जिममध्ये बराच वेळ घालवते आणि वजनही उचलते, ज्यामुळे तिने एका तरुणीप्रमाणे तिचे फिगर राखली आहे. कित्येकदा लोक तिला आपल्या मुलांची मोठी बहीण मानतात. सन 2000 मध्ये, जेव्हा ती 16 वर्षांची होती, तेव्हा ती पहिल्यांदा गरोदर राहिली आणि 2001 मध्ये तिने तिची मोठी मुलगी एलिझाला जन्म दिला. त्यानंतर 2 वर्षांनी तिने दुसरी मुलगी शीनाला जन्म दिला. 2004 मध्ये तिने तिसर्या मुलीला जन्म दिला पण डॉक्टर तिचा जीव वाचवू शकले नाहीत. 2005 पासून तिची आई होण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि तिने जहाँ, कैरो, सैया अवी, रोमानी आणि तेहज यांना जन्म दिला. त्यांचा सर्वात लहान मुलगा सध्या 10 वर्षांचा आहे.
इन्स्टाग्रामवर 4 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. ती अनेकदा तिच्या कुटुंबाशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने एका व्हिडिओमध्ये सांगितले की, ती सलग 10 वर्षे प्रेग्नंट होती, ज्यावर लोकांनी तिला खूप ट्रोल केले. मात्र, तिला लोकांच्या ट्रोलिंगशी काहीच हरकत नाही. तिच्या शेवटच्या मुलाच्या जन्मानंतर, तिच्यावर ट्यूबल लिगेशनची शस्त्रक्रिया झाली जेणेकरून आता ती पुन्हा आई होऊ शकणार नाही. सध्या तिच्याविषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली दिसतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mother, Social media viral, Top trending, Viral