Home /News /viral /

निसर्गाची कमाल! 70 चिमण्यांनी वाजवलं जबरदस्त गिटार, VIDEO पाहून म्हणाल क्या बात है!

निसर्गाची कमाल! 70 चिमण्यांनी वाजवलं जबरदस्त गिटार, VIDEO पाहून म्हणाल क्या बात है!

@thegallowboob नावाच्या युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. 70 चिमण्या गिटार वाजवत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत असल्याचं युझरनं कॅप्शन दिलं आहे.

    मुंबई, 19 ऑक्टोबर : गिटारच्या तारा सुरात छेडणं काही सोपं नाही पण 70 चिमण्यांनी मिळून ही अशक्य गोष्टही शक्य केली आहे. नेहमी चिवचिवाट करणाऱ्या चिमण्यांनी मात्र गिटार वाजवल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की माणूस नाही तर चक्क चिमण्या या गिटारच्या शोरुममध्ये शिरून गिटार वाजवत आहेत. एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी ठेवलेल्या गिटारवर जाऊन त्या वाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. मॉन्ट्रियल म्युझियम ऑफ फाईन आर्ट्सच्या संगीत प्रदर्शनाचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. झेब्रा फिंच नावाच्या 70 चिमण्यांनी एकसाथ इलेक्ट्रिक गिटारवरून बसून त्याच्या तारा छेडल्या आहेत. हा व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारा नक्कीच आहेत. हे वाचा-कडक सॅल्युट! जलमय झालेल्या रस्त्यातून तरुणानं गाड्यांना दाखवली वाट, पाहा VIDEO @thegallowboob नावाच्या युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. 70 चिमण्या गिटार वाजवत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत असल्याचं युझरनं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये टार मोठ्या हॉलमध्ये विशिष्ट अंतरावर ठेवलेले आहेत. भिंतीवर चिमण्यांसाठी छिद्र आहेत. त्यामधून चिमण्या हॉलमध्ये ये-जा करतात. या चिमण्या गिटारवर बसून धून वाजवत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या