Home /News /viral /

VIDEO - किती दिवस पाहणार सासू-सुनेचा फक्त ड्रामा; आता हे जबरदस्त Saas Bahu Bhajan एकदा ऐकाच

VIDEO - किती दिवस पाहणार सासू-सुनेचा फक्त ड्रामा; आता हे जबरदस्त Saas Bahu Bhajan एकदा ऐकाच

सासू-सुनेवरील हे जबरदस्त भजन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

    मुंबई, 28 एप्रिल : प्रत्येक घरात सासू-सुनेचे किस्से ऐकायला मिळतातच (Mother in Law and Daughter in law news). काही प्रेमाचे असतात तर काही भांडणाचे. सासू-सून ही फक्त घरापुरती मर्यादित राहिली नाही म्हणजे ती पडद्यावरही आली. टीव्ही सीरिअल, फिल्म यामध्ये सासू-सुनेचं नातं दाखवलं जातं. जे पाहायला अनेकांना आवडतं. आतापर्यंत तुम्ही सासू-सुनेचे असे ड्रामेच पाहिले असतील. पण किती दिवस तुम्ही फक्त असे ड्रामे पाहणार. आता सासू-सुनेच्या या नात्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने पाहूया. त्यासाठी सासू-सुनेवरील हे जबरदस्त भजन तुम्ही एकदा ऐकाच (Saas bahu bhajan). भजन आणि तेसुद्धा सासू-सुनेवर ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण काही महिलांनी खरंच असं भजन लिहिलं आहे आणि गायलं आहे. या भजनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ओम जय जय सास बहू असे या भजनाचे बोल आहेत. भजन रास गीत नावाच्या युट्यूब अकाऊंटवर या भजनाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात तीन महिला दिसत आहे. एक महिला ढोलकी वाजवत हे भजन गाते आहे तर बाकी दोघी तिला साथ देत आहेत. महिला सुरुवातीला सासू-सुनेची एक गोष्ट सांगते. त्यानंतर ती या गोष्टीला धरून भजन गाऊ लागते. यामध्ये सासूला साधीभोळी तर सुनेला 420 म्हटलं आहे. हे वाचा - लग्न होताच नवरदेवाला 'जोर का झटका', भरमंडपात ढसाढसा रडू लागला; VIDEO VIRAL हे एक मजेशीर भजन आहे. ज्यांनी हे भजन ऐकलं त्यांनी या भजनाला दाद दिली आहे. भजनाचे बोल आणि ती गाण्याची पद्धत सर्वांना आवडली आहे. तुम्हाला हे भजन कसं वाटलं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Funny video, Relationship, Viral, Viral videos

    पुढील बातम्या