मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बाबो! या साध्याभोळ्या आजीबाईच्या फाडफाड इंग्लिशसमोर भलेभले फेल; एकदा तरी पाहाच हा VIDEO

बाबो! या साध्याभोळ्या आजीबाईच्या फाडफाड इंग्लिशसमोर भलेभले फेल; एकदा तरी पाहाच हा VIDEO

फाडफाड इंग्रजी बोलणारी देशी आजी.

फाडफाड इंग्रजी बोलणारी देशी आजी.

फाडफाड बोलणाऱ्या या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 28 सप्टेंबर : डोक्यावर आणि शरीराला गुंडाळलेली लाल ओढणी, अंगावर सफेद शर्ट अशा या देशी आजी. त्यांना पाहून या गावातील अडाणी आजी असाव्यात असंच वाटतं. तुम्हालाच नाही तर कित्येकांना सुरुवातीला असंच वाटलं. पण जेव्हा या आजीबाईंचा व्हिडीओ पाहिला, ऐकला तेव्हा मात्र भलेभले गार पडले आहेत. या आजीबाईंनी कामच तसं केलं आहे. भोळ्याभाबड्या या आजीने असं काही करून दाखवलं की अनेकांनी आपल्या तोंडात बोटं घातली आहेत.

मातृभाषेत शिक्षण घेतलं असेल तर इंग्रजी वाचता, लिहिता येत असलं तरी बिनधास्तपणे बोलणं अनेकांना शक्य होत नाही. इंग्रजी काय सोपं आहे, असं अनेकांना वाटतं. पण ते प्रत्यक्षात बोलताना काय अवस्था होते, हे कित्येकांना माहितीच असेल. त्यावेळी कुणीतरी आत्मविश्वास वाढवणारं हवं असतं आणि आत्मविश्वास असेल तर काहीही शक्य आहे. हेच या आजीने दाखवून दिलं आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहाल, आजीसमोर कुणीतरी कॅमेरा धरून उभा आहे. जो या आजीचा व्हिडीओ रेकॉर्ड करतो आहे. ती व्यक्ती आजीला महात्मा गांधीवर काही शब्द बोलायला सांगते. आजी सुरुवातीला महात्मा गांधी असं म्हणते आणि मध्येच थोडा ब्रेक घेते. आता आजी आपल्या गावच्या भाषेत, गावच्या स्टाइलने महात्मा गांधींची माहिती देईल असं वाटतं. पण या आजीने तर सर्वांनाच थक्क केलं. आजीने चक्क इंग्रजीत माहिती द्यायला सुरुवात केली.

हे वाचा - मुलीसाठी आईचा Desi Jugaad, सायकलवर बनवली 'कारवाली सीट', Video पाहून विश्वास बसणार नाही

'महात्मा गांधी वॉझ वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅन ऑफ द वर्ल्ड....' या वाक्याने आजी सुरुवात करते ती तिची सुपरफास्ट ट्रेन सुरूच राहते. फाडफाड इंग्रजी बोलत आजी महात्मा गांधींची माहिती देते.

View this post on Instagram

A post shared by Yogesh Lata (@latayogesh79)

तिची इंग्रजी ऐकून शाळेत रट्टा मारून जाणारे विद्यार्थीही समोर येतोच. पण आजीच्या आत्मविश्वासाला दाद द्यायला हवी.  फाडफाड इंग्रजी बोलताना तिने काही चुकाही केल्यात. पण या चुका इंग्रजी बोलताना तिच्या असलेल्या आत्मविश्वासासमोर झाकल्या गेल्या.

हे वाचा - चार बहिणींनी केली वयाची 92 वर्षं पूर्ण; नवा विक्रम करत गिनिज बुकात नोंद

हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पण आजीच्या पेहरावावरून ही आजी राजस्थानची असावी असं वाटतं. तिच्या बोलण्यात मारवाडी भाषेचा लयही आहे. latayogesh79  इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. युझर्सनी आजीचं कौतुक केलं आहे. वाह आजीचं इंग्लिश तर जबरदस्त आहे, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एका युझरने आजीने गुगलमध्ये काम केलं आहे वाटतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ही फाडफाड बोलणारी आजी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:

Tags: Viral, Viral videos