मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! पुंगी वाजताच डुलू लागली आजी; नागिण बनून नातवालाच डसली; पाहा Naagin Dance Video

OMG! पुंगी वाजताच डुलू लागली आजी; नागिण बनून नातवालाच डसली; पाहा Naagin Dance Video

Old woman nagin dance with grandson : आजी-नातवाचा जबरद्स्त नागिण डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Old woman nagin dance with grandson : आजी-नातवाचा जबरद्स्त नागिण डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Old woman nagin dance with grandson : आजी-नातवाचा जबरद्स्त नागिण डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 01 जून : नाचता येत नसलं तरी नागिण डान्स हा प्रत्येकाला येतो (Naagin dance funny video). त्यामुळे लग्न असो का इतर कोणताही कार्यक्रम यावेळी डान्स प्रोग्राममध्ये नागिण डान्स पाहायला मिळतोच. पुंगीचा आवाज ऐकू यायला लागला की काही लोक नागिणीसारखे डोलू लागतात. एक गारूडी बनतो आणि एक नाग. मग दोघांचा सुरू होतो तो नागिण डान्स. नागिण डान्सचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तुम्ही नागिण डान्सचे भरपूर व्हिडीओ पाहिले असतील पण असा व्हिडीओत कदाचित पहिल्यांदाच पाहाल. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू बिलकुल आवरणार नाही (Old woman naagin dance video). नागिण डान्समध्ये जसं आपण म्हटलं दोन व्यक्ती समोरासमोर असतात. एक गारूडी आणि एक नाग. या व्हिडीओत गारूडी आणि नागाची जोडी आहे ती आजी-नातवाची. नातू गारूडी बनला आहे तर आजी नागिण. पुंगीचा आवाज ऐकताच आजीबाईने नागिणीचा अवतार घेतला आणि आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या गारूडी नातवालाच ती डसली (Grandmother grandson naagin dance video). व्हिडीओत पाहू शकता बरेच लोक दिसत आहेत. नागिण गाण्याची धून ऐकायला येत आहे. एक तरुण आणि त्याच्यासोबत काही महिला नाचताना दिसतात. त्यानंतर हा तरुण आपल्या आजीला घेऊन येतो. तेव्ह सर्वजण बाजूला होतात. मध्ये फक्त आजी आणि नातू उभे असतात. आजी-नातू समोरासमोर उभे राहतात. नातू आपल्याजवळील रूमालाचं एक टोक तोंडात धरतो आणि दुसरं टोक हातात. रूमालाची पुंगी करून तो पुंगीसारखी गाण्याच्या तालावर फिरवतो. हे वाचा - VIDEO - बाटलीऐवजी मित्राच्या भलत्याच भागावर बसली जोरदार किक; खेळाखेळात झाली भयंकर चूक आजी सुरुवातीला शांत उभी असते. ती काही करणार नाही असं वाटतं. पण नंतर आजी आपला जलवा दाखवतो. नातू गारूडी होऊन पुंगी वाजवू लागताच आजीसुद्धा नागिणीचा अवतार घेता. हाताचा नागोबा करत ती डोलू लागते. तिच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत. तिने डोळे थोडे मोठे केले आहेत, चेहऱ्यावर बिलकुल हसू नाही. एखादी नागिण जशी रागात असावी तसाच तिचाही चेहरा पाहायला मिळतो. पुढे आजी जे करतं ते यापेक्षाही धक्कादायक आहे. ती नाचता नाचता नातवाला दंश करताना दिसते. आपल्याला तालावर नाचायला लावणाऱ्या गारूडी नातवावर ती नागिण डान्स करताना हल्ला करते. एक-दोन नाही तर किती तरी वेळा ती अशी डसताना दिसताना. यावेळी बऱ्याचदा तिचा नातू जमिनीवर कोसळतोही. तोसुद्धा पुन्हा पुन्हा उभा राहून पुंगी वाजवताना दिसतो. तिथं उपस्थित लोकही आजीचा जोश पाहून हैराण होतात. हे वाचा - WOW! जंगलाच्या राजासमोर तर मॉडेल्सही फेल; सिंहाचे PHOTO पाहून तुम्हीही प्रेमात पडाल Anshul yadav shikohabad यूट्यूब युझरने आपल्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. नेटिझन्सनाही नागिण आजीचा अंदाज आवडला आहे. व्हिडीओवर बऱ्याच मजेशीर कमेंटही येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
First published:

Tags: Dance video, Viral, Viral videos

पुढील बातम्या