मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आजीबाईंनी पहिल्यांदाच खाल्ला पिझ्झा; खाताच चेहऱ्यावर दिले मजेशीर हावभाव, पाहा VIDEO

आजीबाईंनी पहिल्यांदाच खाल्ला पिझ्झा; खाताच चेहऱ्यावर दिले मजेशीर हावभाव, पाहा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन वृद्ध महिला बेडवर पिझ्झा घेऊन बसलेल्या दिसतात. यादरम्यान एक वृद्ध महिला दुसऱ्या वृद्ध महिलेला पिझ्झाची एक स्लाईस देते.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 09 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका देशी आजीबाईचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video of Old Woman) होत आहे. ही वृद्ध महिला पहिल्यांदाच पिझ्झा ट्राय करते. यानंतर पिझ्झा (Pizza) खाल्ल्यानंतर महिला ज्या पद्धतीनं हावभाव देते, ते लोकांचं मन जिंकणारे आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. 28 ऑक्टोबरला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आता व्हायरल (Viral Video) होत आहे. 50 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

स्टेजवरच पाया पडू लागले नवरदेवाचे मित्र; पाहा रागावलेल्या नवरीनं काय केलं, VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन वृद्ध महिला बेडवर पिझ्झा घेऊन बसलेल्या दिसतात. यादरम्यान एक वृद्ध महिला दुसऱ्या वृद्ध महिलेला पिझ्झाची एक स्लाईस देते. आधी तर आजीबाई पिझ्झा खाण्यास नकार देतात. मात्र नंतर याची चव चाखण्यासाठी तयार होतात. यानंतर जे काही घडतं ते अतिशय मजेशीर आहे. वृद्ध महिला पिझ्झा खाताच हसून अजब हावभाव देते.

View this post on Instagram

A post shared by Greeshbhatt (@greesh_bhatt_)

आजीबाईचा हा क्यूट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर greesh_bhatt_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यूजरनं कॅप्शनमध्ये लिहिलं, आजीबाईनं पहिल्यांदाच पिझ्झा खाल्ला. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, बहुतेक आजींना पिझ्झाची चव आवडलेली नाही. तर दुसऱ्या एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, पिझ्झा खाल्लानंतर आजीबाईने जे हावभाव दिले ते मला सर्वात जास्त आवडलं. आजीबाई फारच क्यूट दिसत आहे.

पत्नीनं सतत खोटं बोलून पतीला बनवलं मानसिक रूग्ण; बँक खात्यातून लंपास केले 4 कोटी

व्हिडिओमध्ये आजीबाईनं जे क्यूट एक्सप्रेशन दिले आहेत, ते नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. काहींनी आजीबाई अतिशय क्यूट असल्याचं म्हटलं तर काहींनी आजीबाईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. एकंदरीतच आजीबाईचा हा व्हिडिओ प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.

First published:

Tags: Funny video, Pizza, Video Viral On Social Media