Home /News /viral /

आजोबांचा खतरनाक BIKE STUNT VIDEO पाहून पोलीसही हादरले; केली कठोर कारवाई

आजोबांचा खतरनाक BIKE STUNT VIDEO पाहून पोलीसही हादरले; केली कठोर कारवाई

प्रसिद्ध होण्यासाठी आजोबांनी बाईकवर खतरनाक स्टंट केला आणि हा स्टंट त्यांना चांगलाच भारी पडला.

    लखऊन, 29 एप्रिल : हल्ली सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याची हौस अनेकांना आहेत. त्यासाठी बऱ्याच लोकांची काहीही करण्याची तयारी असते. विशेषतः तरुण तर जीवघेणे, खतरनाक स्टंटही करताना दिसतात. पण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे स्टंट करण्यात आता वृद्ध व्यक्तीही मागे नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो पाहून पोलीसही हैराण झाले (Old man bike stunt). एक वृद्ध व्यक्ती बाईकवर खतरनाक स्टंट करताना दिसली. भरधाव बाईकवर या व्यक्तीने स्टंट केले आहेत. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला. हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्यांनीही कारवाई केली आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधील बेव सिटीतील असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडीओत पाहू शकता ही वयस्कर व्यक्ती बाईकवर येऊन बसते. त्यानंतर बाईकचं हँडल हातात  न धरता बॅक सीटवर एक पाय वर आणि एक पाय खाली ठेवून अगदी तोऱ्यात बसते. तर कधी बाईकवर दोन्ही हात पसरून उभी राहते. त्यावेळी बाईक सुसाट वेगाने पळते आहे. हे वाचा - बापरे! तरुणाच्या खांद्यावर चढले 2 महाकाय अजगर आणि...; थरकाप उडवणारा VIDEO हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असल्याने हे आजोबा प्रसिद्ध झाले पण त्यांना हा स्टंट तितकाच भारी पडला आहे. त्यांचा हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की तो पोलिसांपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.  पोलिसांनी त्यांचं चालान कापलं. गाजियाबाद पोलिसांना हा व्हिडीओ ट्विटर युझरने टॅग केला. हे वाचा - चिमुकल्यांचं एक छोटंसं पाऊल, वाचला कित्येक लोकांचा जीव; Must Watch Video पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आणि ताबडतोब पाऊल उचललं.  त्यांनी त्याचं 26 हजार 500 रुपयांचं चालान कापलं आहे. पोलिसांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Stunt video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या