• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • नातवानं पूर्ण केली दुर्धर आजारानं ग्रस्त 84 वर्षाच्या आजीची शेवटची इच्छा; विमान उडवतानाचा VIDEO VIRAL

नातवानं पूर्ण केली दुर्धर आजारानं ग्रस्त 84 वर्षाच्या आजीची शेवटची इच्छा; विमान उडवतानाचा VIDEO VIRAL

पार्किन्सन्स डिसीज हा अतिशय दुर्धर आजार आहे. यामध्ये मानवाची मध्यवर्ती मज्जासंस्था (central nervous system) हळूहळू निकामी होत जाते. व्यक्तीच्या हाता-पायांना कंप सुटतो.

  • Share this:
नवी दिल्ली 19 ऑक्टोबर : एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या अनेक इच्छा अपूर्णच राहतात. एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत शक्यतो असं होत नाही. कारण, अशा व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही वेळ नक्कीच हातात असतो. अशाच एका दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या महिलेची शेवटची इच्छा तिच्या मुलानं पूर्ण केली आहे. पार्किन्सन्सग्रस्त (Parkinson) असलेल्या एका 84 वर्षांच्या आजीबाईनं चक्क विमान उडवलं आहे! या आजीबाईंच्या विमान (Plane) उड्डाणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असून जगभरातून त्यांचं कौतुक होत आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पार्किन्सन्स डिसीज हा अतिशय दुर्धर आजार आहे. यामध्ये मानवाची मध्यवर्ती मज्जासंस्था (central nervous system) हळूहळू निकामी होत जाते. व्यक्तीच्या हाता-पायांना कंप सुटतो. शारीरिक हालचाली मंदावतात. पार्किन्सन असलेली व्यक्ती हळहळू पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून होते. दुर्दैवानं यावर अद्याप कोणताही ठोस उपचार उपलब्ध नाही. 84 वर्षीय मार्टा गेज नावाची माजी वैमानिक महिला देखील सध्या अॅडव्हॉन्स स्टेज पार्किसन्सनं ग्रस्त आहेत. आपला मृत्यूजवळ आल्याची जाणीव झाल्यानं मार्टानं आपल्या मुलाकडं आपली शेवटी इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली. मार्टाचा मुलगा अर्ल गेजनं देखील आईची विमान उडवण्याची शेवटची इच्छा पूर्ण केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुतिन यांची मुलाखत घेताना महिला अँकरने केलं विचित्र कृत्य; देशभरात गोंधळ 'नाऊ धिस'नं हा व्हिडिओ आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. अपलोड केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही क्षणांतच 2 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला होता. नेटिझन्सना मार्टाचा व्हिडिओ आवडला असून अनेकांनी मार्टाचं कौतुक करणाऱ्या कमेंट्सदेखील केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये, मार्टा गेज विमानाच्या कॉकपिटमध्ये बसलेल्या दिसत आहेत. पार्किन्सन असून देखील त्या अतिशय सराईतपणे विमान उडवत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसत आहे. या वयात विमान उडवून त्यांनी आपल्या तरुणपणातील दिवस पुन्हा अनुभवले. मार्टा विमान उडवत असताना त्यांच्या मुलानं मागून आईला प्रोत्साहन दिलं आणि एक व्हिडिओदेखील रेकॉर्ड केला. माजी वैमानिक (Ex Pilot) मार्टा गेज यांचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर फॉक्स न्यूज वाहिनीनं अर्ल सेजची मुलाखत घेतली. आईला पार्किन्सन असल्यामुळं आपली दैनंदिन काम करण्यासाठी देखील तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कदाचित तिच्याकडे थोडेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं तिची बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा निर्णय आमच्या कुटुंबानं घेतला आहे. तिला विमान उडवण्याची इच्छा होती. याबाबत वैमानिक (aviator) कोडी मॅटिलो यांच्या कानावर घातली असता त्यांनी तत्काळ मदत करण्याची तयारी दर्शवली. व्हिडिओमध्ये आईचे सहवैमानिक म्हणून मॅटिलो यांनी जबाबदारी पार पाडली असल्याची माहिती, अर्ल सेज यांनी दिली. अविवाहित महिलेला लागली मुलं जन्माला घालायची चटक; 8 मुलांना दिलाय जन्म मला काही दिवसांपूर्वी एका पार्किन्सन्सग्रस्त माजी वैमानिकाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यास सांगितलं होतं. वयाच्या नव्वदीमध्ये असल्यानं आणि आजारपणामुळं फ्लाइट स्कूल तिला विमान वापरण्याची परवानगी देत नव्हती. म्हणून मी स्वत: मदत करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मॅटिलो यांनी दिली.
First published: