मराठी बातम्या /बातम्या /Viral /इश्श, पुरे आता! आजोबांनी सर्वांसमोर असं काय केलं की आजीबाई लाजली? वृद्ध दाम्पत्याचा VIDEO तुफान व्हायरल

इश्श, पुरे आता! आजोबांनी सर्वांसमोर असं काय केलं की आजीबाई लाजली? वृद्ध दाम्पत्याचा VIDEO तुफान व्हायरल

वृद्ध कपलचा व्हिडीओ व्हायरल.

वृद्ध कपलचा व्हिडीओ व्हायरल.

वृद्ध दाम्पत्याच्या या प्रेमाने सर्वांचं मन जिंकलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 05 मार्च : कपलचे तसे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. वृद्ध दाम्पत्याचा हा व्हिडीओ आहे. या वृद्ध दाम्पत्याचं प्रेम पाहून कित्येक तरुण-तरुणीही त्यांच्या प्रेमात पडले आहेत. या व्हिडीओला क्युट व्हिडीओ म्हणत, हेच खरं प्रेम, प्रेम असावं तर असं, अशा कमेंट येत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

असे कित्येक कपल आहेत ज्यांची प्रेम टिकत नाही, लग्न टिकत नाही. लग्नाआधी सर्वकाही सुरळीत असतं पण लग्नानंतर त्यांच्यात भांडणं होतात आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. लग्नाच्या काही महिन्यात एकमेकांपासून वेगळे होणारे कपलही आहेत. अशा कपल्सनी तर या कपलचा व्हिडीओ पाहायलाच हवा. तसं पाहिलं तर या कपलने जे केलं ते तुम्हाला छोटंसं वाटेल पण तुम्ही अगदी मन लावून हा व्हिडीओ पाहिलात तर तुम्हाला त्यांच्यातील प्रेम दिसेल, समजेल, जाणवेल.

आता काय म्हणावं हिला! म्हणे, 'नवरा नको, स्मार्टफोन हवा'; मोबाईलवेड्या पत्नीने शेवटी पतीला....

व्हिडीओ पाहाल तर एका पर्यटनस्थळावरचा हा व्हिडीओ आहे. आता पर्यटनस्थळ म्हटलं की फोटो, सेल्फी आलाच. हे कपलही फोटो काढत होतं. आजोबांनी आपल्या हातात मोबाईल धरला आहे आणि आजी समोर उभ्या आहेत. त्यांच्यामागे शंकराची मोठी मूर्ती दिसते आहे. आजोबा या मूर्तीसह आपल्या बायकोला कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी कंबर वाकडी करून, मान झुकवून ते बायकोच्या परफेक्ट फोटोसाठी प्रयत्न करत आहेत.

आजोबा आजीला पोझ द्यायला सांगत आहे आणि तसा आपला मोबाईला कॅमेरा फिरवून वेगवेगळ्या अँगलने फोटो घेत आहेत. त्याचवेळी पोझ देणाऱ्या आजीला मात्र हसू आवरत नाही. तिला इतकी लाज वाटते की आजोबांनाही थांबवते.

दूर राहूनही तुम्ही एकमेकांना करू शकता Lip to Lip kiss; कसं ते पाहा ही सॉलिड टेक्निक

@yoga_with_kush  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हेच प्रेम आहे, हा व्हिडीओ खूप क्युट आहे, या दोघांचं प्रेम असंच राहू दे असं कित्येकांनी म्हटलं आहे. तर काहींनी आपण आणि आपला जोडीदारही असेच असू असंही म्हटलं आहे.

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Couple, Relationship, Viral, Viral videos