मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे देवा! Live बातम्या देत असताना रिपोर्टरला लुटलं; बंदुकीचा धाक दाखवित असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद

अरे देवा! Live बातम्या देत असताना रिपोर्टरला लुटलं; बंदुकीचा धाक दाखवित असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद

पत्रकार लाइव्ह बातम्या देत असल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. काही वेळी यातून अनेक विनोदी प्रसंगाही घडतात. मात्र हा प्रकार भयंकर आहे

पत्रकार लाइव्ह बातम्या देत असल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. काही वेळी यातून अनेक विनोदी प्रसंगाही घडतात. मात्र हा प्रकार भयंकर आहे

पत्रकार लाइव्ह बातम्या देत असल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. काही वेळी यातून अनेक विनोदी प्रसंगाही घडतात. मात्र हा प्रकार भयंकर आहे

क्विटो, 19 फेब्रुवारी : पत्रकार लाइव्ह बातम्या देत असल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. काही वेळी यातून अनेक विनोदी प्रसंगाही घडतात. मात्र दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर या देशात विचित्र प्रकार पाहायला मिळाला.

पत्रकार लाइव्ह रिपोर्टिंग करताना बंदुकीचा धाक दाखवून एका रिपोर्टर आणि कॅमेरामॅनला लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गेल्या आठवड्यातील असून स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, इक्वाडोर येथील एका क्रीडा पत्रकाराला लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान लुटण्यात आलं. त्याचं झालं असं की, क्रीडा पत्रकार डिआगो ओडिनोल लाइव्ह रिपोर्टिंग करीत होते.

हे ही वाचा-WhatsApp, Signal, Telegram; आता इन्स्टंट मेसेजिंग ॲपवरही द्या ऑटो रिप्लाय

त्याच वेळी एक चोर लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान आला व पत्रकाराला धाक दाखवू लागला. चोराने यावेळी मास्क लावला होता. पत्रकारांना घाबरवण्यासाठी तो बंदुकीचा वापर करीत होता. तो पत्रकाराकडून मोबाइलची मागणी करू लागला. पत्रकारानंतर चोराने कॅमेऱ्यामॅनकडे बंदुक रोखली व त्याच्याकडूनही पैशांची व फोनची मागणी करू लागला. कॅमेरामॅनने यावेळी कॅमेरा सुरूच ठेवला होता. त्यामुळे तेथे घडलेला सर्व प्रकार चित्रित झाला. धक्कादायक म्हणजे ही चोरीची घडना दुपारी 2 वाजता स्टेडिअमच्या बाहेर घडली. हा व्हिडिओ ट्वीटर व सोशल मीडियाच्या इतर साइट्सवर व्हायरल होत आहे.

 

First published:
top videos

    Tags: Viral video on social media