कायच्या काय! आता पुरुषही देऊ शकणार बाळाला जन्म; चीनच्या वैज्ञानिकांचं भलतंच संशोधन

शस्त्रक्रियेद्वारे मादीच्या शरीरातून काढलेले गर्भाशय नराच्या शरीरात फिट केलं गेलं. यानंतर, नर गरोदर राहिला आणि मुलांचा जन्म सिझेरियनच्या माध्यमातून झाला

शस्त्रक्रियेद्वारे मादीच्या शरीरातून काढलेले गर्भाशय नराच्या शरीरात फिट केलं गेलं. यानंतर, नर गरोदर राहिला आणि मुलांचा जन्म सिझेरियनच्या माध्यमातून झाला

  • Share this:
    नवी दिल्ली 18 जून : चिनी वैज्ञानिक अनेकदा काहीतरी विचित्र संशोधन (Weird Experiment) किंवा प्रयोग करत असतात. अलीकडेच चीनच्या वुहान लॅबमधील (Wuhan Lab) एका वैज्ञानिकानी असा दावा केला होता, की चीन विचित्र संशोधन करत राहतं. तिथे अशी बरीच संशोधनं केली जातात ज्यावर सामान्यत: इतर देशांमध्ये बंदी आहे. यामध्ये आता चिनी शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे, की त्यांनी पुरुषांना गर्भवती करण्याचा चमत्कार केला आहे. यासाठी ते बर्‍याच वर्षांपासून संशोधन करत होते. आता या संशोधनाचा निकाल समोर आला आहे. चीनमधील वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनात नर उंदरांच्या शरीरावर प्रयोग करण्यात आले. यात शस्त्रक्रियेद्वारे मादीच्या शरीरातून काढलेले गर्भाशय नराच्या शरीरात फिट केलं गेलं. यानंतर, नर गरोदर राहिला आणि मुलांचा जन्म सिझेरियनच्या माध्यमातून झाला. या संशोधनानंतर आता भविष्यात पुरुषांचं गरोदर राहाण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. इन्फोव्हर्सच्या अहवालानुसार या संशोधनानंतर आता ज्या ट्रान्सजेंडर्सना मुलांना जन्म देण्याची इच्छा आहे, त्यांना मदत मिळेल. धक्कादायक! नदी, तलावांच्या पाण्यातही Corona विषाणू सापडत असल्यानं खळबळ हा प्रयोग शांघायच्या (Shanghai) नेव्हल मेडिकल युनिव्हर्सिटीने केला आहे. यात संशोधकांनी आधी मादी उंदरांच्या शरीरातून गर्भाशय बाहेर काढले. यानंतर, ते एका नर उंदराच्या शरीरात फिट केले. या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणानंतर तो नर उंदीर गरोदर राहिला आणि सिझेरियनच्या माध्यमातून डिलिव्हरी केली गेली. हे संशोधन चार टप्प्यात पूर्ण केलं गेलं. याला रॅट मॉडेल (Rat Model) असे म्हणतात. मात्र, सध्या याचा सक्सेस रेट फक्त 3.68 टक्के असल्याचं नोंदविण्यात आलं आहे. नर उदरांवर हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यानं 10 मुलांना जन्म दिला आहे. Watch Exclusive Video: आरोग्य कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर राडा चीनमधील संशोधक आता मानवांवर रॅट मॉडेल अवलंबण्याचा विचार करीत आहेत. प्रयोगात पुरुषाला गरोदर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सस्तन प्राण्यावर झालेल्या या प्रयोगाने आता मानवांमध्येही त्याच्या यशाची आशा वाढली आहे. यापूर्वी NYU स्कूल ऑफ मेडिसिननेदेखील ट्रान्सजेंडर्ससाठीही असाच प्रयोग केला होता.
    Published by:Kiran Pharate
    First published: