'अब मैं सबमें फैलाऊंगा कोरोना', VIRAL VIDEO नंतर लोकांमध्ये भीती

'अब मैं सबमें फैलाऊंगा कोरोना', VIRAL VIDEO नंतर लोकांमध्ये भीती

कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार पसरवला असतानाच अचानक आणखी एक भीती निर्माण करणारा व्हिडीओ समोर आला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 21 मार्च : कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार पसरवला असतानाच अचानक आणखी एक भीती निर्माण करणारा व्हिडीओ समोर आला आहे. काही तासांपूर्वी आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण सांगत आहे की मला कोरोना व्हायरस झाला आहे आणि हा व्हायरस वेगानं मी वेगानं सगळीकडे पसरवणार आहे. मला कुणीही अडवू शकत नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे आधीच 11 हजार लोकांना मृत्यू झाला आहे तर हजारो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतात 250 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

हा विषाणू सगळीकडे पसरवणार अशी दिली धमकी

उर्दू वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हा 25 सेकंदाचा व्हिडीओ आहे. जो सरकारला चेतावनी देणारा आहे. मला कोरोनाची लागण झाली आहे आणि हा व्हायरस आता मी सगळीकडे पसरवणार आहे. मला कुणीही अडवू शकत नाही असं या तरुणानं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटवर युझर्सनी चिंता व्यक्त केली आहे. तसच या तरुणाविरोधात तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. या व्हिडीओमधून सरकारला आव्हान देण्यात आलं आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ 18 मार्चला सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र त्यांनंतर पुन्हा एकदा 19 मार्चला आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या दुसऱ्या व्हिडीओमध्ये तरुण आपण केलेल्या कारनाम्याची सफाई देताना दिसत आहे. हा व्हिडीओ मित्रांनी मिळून केला होता. हा मुद्दाम व्हायरल करण्याचा आमचा हेतू नव्हता. असं या तरुणानं म्हटलं आहे. या तरुणानं पाकिस्तान आणि लोकांची या व्हिडीओमध्ये माफी मागितली आहे. हा तरुण पेशावर इथला असल्याचा दावा काही युझर्सनी केला आहे. तर या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचा दावाही काही युझर्सनी केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. अशा पद्धतीचं धाडस करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी काही युझर्सनी केली आहे.

First published: March 21, 2020, 1:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading