मराठी बातम्या /बातम्या /Viral /टपरीच्या जागेसाठी लिलावात चहाविक्रेत्याची सरशी; तब्बल 3.25 लाख रुपये मासिक भाडं देणार

टपरीच्या जागेसाठी लिलावात चहाविक्रेत्याची सरशी; तब्बल 3.25 लाख रुपये मासिक भाडं देणार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सोनू कुमार झाचे वडील दिगंबर झा यांचं मूळ गाव बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातलं. गेल्या 25 वर्षांपासून ते नोएडाच्या सेक्टर 18मध्ये पानटपरी चालवतात

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली :  मुंबई यांसारख्या शहरांमध्ये जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. नवी दिल्लीलगतच्या नोएडा या शहरात अनेक उद्योगधंदे आहेत. त्यामुळेच नोएडा भागात जागांचे भाव भरपूर आहेत. त्यातही सेक्टर 18 हा भाग उच्चभ्रू वस्तीचा असून तिथं रहिवासी जागा व उद्योगधंदे एकवटलेले आहेत. त्यामुळेच तिथे जागा महाग आहेत. असं असतानाही एका चहाविक्रेत्यानं टपरीच्या जागेसाठी लिलाव जिंकून मासिक 3.25 लाख रुपये भाडं देण्याचं मंजूर केल्यानं सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. हा लिलाव जिंकल्यामुळे सोनू कुमार झा प्रसिद्धीझोतात आला आहे.

  सोनू कुमार झाचे वडील दिगंबर झा यांचं मूळ गाव बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातलं. गेल्या 25 वर्षांपासून ते नोएडाच्या सेक्टर 18मध्ये पानटपरी चालवतात. या टपरीवर तेपान, सिगारेट, गुटखा यांची विक्री करतात. नोएडा शहरात बस्तान बसवल्यानंतर त्यांनी टपरीवर चहा विकण्यास सुरुवात केली. कॉर्पोरेशन बँकेजवळ त्यांची स्वतःची टपरी आहे.

  हे ही पाहा : हे ही पाहा : 'चाकू' घेऊन मुलगी मॉलमध्ये शिरली आणि पुढच्या क्षणी.... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  टपरीच्या ज्या जागेसाठी लिलाव झाला, ती जागा 7 बाय 7 फुटांची असून सेक्टर 18 च्या गजबजलेल्या बाजारपेठेत आहे. अशा काही जागांसाठी 10 जानेवारीला लिलाव करण्यात आला. त्यात सोनू कुमार झा यानं K-3 या टपरीच्या जागेसाठीचा लिलाव जिंकला. या जागेची बेस प्राईस 27 हजार इतकी होती. नोएडातल्या सेक्टर 18च्या मेट्रो स्टेशनच्या जवळ ही जागा आहे.

  सोनू झा याला आता जागेच्या भाड्यापोटी दर महिन्याला 3.25 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. आता चहा, पान, गुटखा आणि सिगारेट याशिवाय त्या टपरीवर काही खाद्यपदार्थांची विक्रीही सुरू करणार असल्याचं झा यांनी एनबीटीला सांगितलंय. आपल्याला आपल्या मुलावर विश्वास असून तो भाड्याची रक्कम वसूल करून नफाही कमावेल असं सोनू झा याच्या वडिलांनी म्हटलंय. सोनूला एक विवाहित बहीण आहे.

  या लिलावात 3.15 लाखांचीही बोली लागली होती. त्याला मागे टाकून सोनू झा यानं 3.25 लाखांची बोली लावून हा लिलाव जिंकला. सोनू कुमार झा यानं 45 लाख रुपये इतकं 14 महिन्यांचं आगाऊ भाडंही दिलं आहे. त्यामुळे त्याला छप्पर असलेली टपरीची जागा मिळाली आहे. या बोलीची किंमत बेस प्राईसपेक्षा 1203 टक्के जास्त आहे. त्यामुळे सर्वांनीच त्याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय; मात्र ही रक्कम देण्यास मुलगा समर्थ असल्याचा विश्वास वडिलांनी व्यक्त केलाय.

  First published:

  Tags: Money, Social media, Social media trends, Tea, Top trending, Viral