आदित्य कुमार (नोएडा) 24 मार्च : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये एक चोरी उघडकीस आली आहे. ही चोरी बघून तुम्हालाही धक्का बसेल. नोएडामधील एका सोसायटीमध्ये लोकांच्या घरासमोरील रोज दूध चोरीला जात होते. चोरीच्या या प्रकारामुळे हैराण झालेल्या लोकांना मोलकरीण आणि सफाई कामगारांवर संशय आला होता. पण सत्य वेगळेच होते. सुरुवातीला लोकांनी याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र सततची घटना पाहता सीसीटीव्ही पाहिल्यानंतर प्रकरण स्पष्ट झाले.
ही दूध चोरी ग्रेटर नोएडा वेस्टमधील लॉजिक्स ब्लॉसम या सोसायटीमध्ये होत होती. या ठिकाणचे रहिवासी रवी श्रीवास्तव सांगतात की, आम्ही दूध ऑनलाईन मागवायचो हे दूध घराच्या दारात ठेवलेले असायचे. सकाळी जेव्हा लोक दार उघडल्यानंतर दुधाचे पाकीट घेण्यासाठी बाहेर यायचे तेव्हा तेथे दुधाचे पाकीट गायब असायचे. दूध विक्रेत्याकडे याची चौकशी केली असता तो दूध पोहोच करत असल्याचे सांगायचा.
लॉजिक्स ब्लॉसम सोसायटीत राहणाऱ्या अजनालीने न्यूज 18 लोकलशी बोलताना सांगितले की, अनेक दिवसांपासून चोरीचे हे प्रकार घडत आहेत. फक्त दूधच नाही तर इतर वस्तूही गायब होत होत्या. येथे 17 टॉवर आहेत पण G टॉवरवर अशी प्रकरणे नेहमी घडत असायची.
दरम्यान यांनी याचा शोध घेताल आहे. दारातून दूध कोण चोरते, याचा प्रत्यय सोसायटीतील रहिवाशांना आला आहे. मी सीसीटीव्ही तपासले तेव्हा मला दिसले की, ऑनलाइन किराणा डिलिव्हरी देणारा तरुण सोसायटीत यायचा तेव्हा तो दारात ठेवलेली दुधाचे पॅकेट आणि इतर वस्तू घेऊन जायचा.
हाच व्हिडिओ किराणा डिलिव्हरी टॅग करत ट्विटरवर पोस्ट करण्यात आला, त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर किराणा डिलिव्हरी कंपनीने यावर उत्तरही दिले आहे. किराणा डिलीव्हरी वाल्याचा शोध घेत असल्याचे सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi News, Local18, Uttar pradesh news