Home /News /viral /

iphone घेण्यासाठी कुऱ्हाड घेऊन गेला, त्यानंतर पठ्ठ्याने असं काही केलं की थेट पोहोचला तुरुंगात!

iphone घेण्यासाठी कुऱ्हाड घेऊन गेला, त्यानंतर पठ्ठ्याने असं काही केलं की थेट पोहोचला तुरुंगात!

आयफोन घेण्यासाठी गेला पण थेट पोहचला तुरुंगात, वाचा काय आहे प्रकरण.

    नोएडा, 07 जानेवारी : आयफोन खरेदी करण्याची सर्वांची इच्छा असते. मात्र आयफोनच्या किमती या दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळं सोशल मीडियावर आयफोन विकत घेण्यासाठी किडनी विकण्याचे मिम्स व्हायरल होत असतात. मात्र 12वीत शिकत असलेल्या एका मुलानं आयफोन खरेदी करण्यासाठी चक्क ATM मशीन फोडली. दादरीमध्ये 12वीत शिकत असलेल्या मुलानं ATM मशीन फोडून पैसे चोरुन नेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दादरी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक दिनेशकुमार सिंह यांनी सांगितले की, 31 डिसेंबर रोजी रेल्वे रोडजवळील ओरिएंटल बँकेचे ATM तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणाचा अहवाल नोंदवून पोलिस या घटनेचा तपास करत होते. वाचा-आठवड्यातून 3 दिवस सुट्टी आणि 6 तासांची शिफ्ट; सर्वात तरुण पंतप्रधानांचा निर्णय वाचा-नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुराग असे या अटक केलेल्या मुलाचे नाव असून तो 12वीत शिकत होता. त्याला रात्री दादरी येथे असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले. वाचा-अंतराळात पहिल्यांदाच घमघमणार चिकन टिक्का आणि मूग हलवा, असा असेल मेन्यू वाचा-घरात निघाला 8 फुटांचा अजगर; त्या सापाशी खेळतोय मुलगा, पाहा VIDEO पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान अटक केलेल्या विद्यार्थ्याने आयफोन खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मान्य केले. आरोपींकडून एटीएम तोडण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड आणि चाकूही पोलिसांनी जप्त करण्यात आले आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Iphone

    पुढील बातम्या