hepgul5 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता या महिलेवर एक-दोन नाही तर बरेच कांदे आहेत. अगदी मोठमोठे कांदा कापताना ती दिसते. हे वाचा - व्हॉट अॅन आयडिया सरजी! चक्क बाईकची कार बनवली; तरुणाने काय केला जुगाड पाहा VIDEO महिलेने कांद्याचे दोन भाग करून ते रांगेत लावले आहेत. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे ती करताना दिसते आहे. आता इतके कांदे पाहून ते कापण्याआधी फक्त विचारानेच आपल्याला रडू आलं असेल. पण ही महिला मात्र हसत हसत इतके कांदे कापते आहे. पण तिच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब नाही आणि याचं कारण म्हणजे तिने डोळ्यांना लावलेलं प्लॅस्टिक. या महिलेने आपल्या डोळ्यांवर एक पारदर्शक प्लॅस्टिक पिशवी गुंडाळली आहे. ज्यामुळे तिला आरपार दिसतं आहे, शिवाय कांदा कापताना तिच्या डोळ्यात जळजळ होत नाही आहे. हे वाचा - रस्त्यावर चालता चालताच हजामत; सायकलवरील फिरत्या सलूनचा VIDEO पाहिलात का? महिलेने इतका मजेशीर जुगाड केला आहे की, कॅमेराकडे पाहताना तिला स्वतःलाही हसू येतं. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरलं नसेल. पण तशी ही आयडिया वाईट नाही, हो की नाही? तुमचं काय मत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Onion, Viral, Viral video.