धक्कादायक! भारतीय पेहराव केला म्हणून तरुणीला रेस्टॉरंटने दिली नाही एन्ट्री, पाहा VIDEO

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक य़ुझर्सनी संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक य़ुझर्सनी संताप व्यक्त केला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 मार्च : हॉटेलमध्ये जाताना काय पोशाख घालावा हे हॉटेलमालकानं ठरवलं तर? असाच प्रकार दिल्लीत घडल्याचं समोर आलं आहे. भारतातील एका हॉटेलमध्येच चक्क भारतीय पोशाख नाकारण्यात आला आहे. तुम्ही भारतीय पोशाखात या हॉटेलमध्ये गेलात तर नो एन्ट्रीचा बोर्ड लावला जातो किंवा आता बसण्यासाठी परवानगी दिली जात नाही. हे ऐकून नक्कीच धक्का बसेल पण हे खरं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला भारतीय पोशाखात हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळी पोशाख या हॉटेलमध्ये चालत नाही असं उत्तर देत तिथल्या कर्मचाऱ्यानं महिलेला बाहेर जाण्याची विनंती केली. ही संपूर्ण घटना या महिलेनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. या महिलेनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-SHOCKING! लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या या सेलिब्रेटींनी तिसऱ्याच व्यक्तीशी केलं लग्न संगीता नाग या दिल्लीतील एक नामांकीत हॉटेलमध्ये भारतीय पोशाख परिधान करून गेल्या होत्या. त्या गुरुग्राम इथल्या शाळेतील मुख्याध्यापिका आहेत. त्यांना हॉटेलमधील कर्मचाऱ्यानं एथनिक कपडे घातल्यामुळे नो एन्ट्री असल्याचं सांगितलं. भारतातील हॉटेलमध्ये अशा पद्धतीचं निर्बंध घालणं किती योग्य आहे? अशा पद्धतीचं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला आतापर्यंत 187k लोकांनी पाहिलं असून 7 हजारहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. 10 मार्चला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता अशी माहिती मिळत आहे. हे वाचा-भारतातील सर्वात मोठी बातमी, कोरोनाग्रस्त विमानात शिरल्याने 270 प्रवासी धोक्यात
    First published: