मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIP संस्कृतीला फाटा; विमानात चढताना नितीन गडकरी उभारले लाईनमध्ये, Video व्हायरल

VIP संस्कृतीला फाटा; विमानात चढताना नितीन गडकरी उभारले लाईनमध्ये, Video व्हायरल

विमानतळावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin gadkari Viral Video) सर्वसामान्य लोकांप्रमाणे विमानात बसण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून येत (Nitin gadkari stands in queue) आहे. या व्हिडिओतून त्यांचा साधेपणा दिसून येत आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या दिलखुलास आणि साध्या व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. आतापर्यंत सत्तेत आलेल्या अनेक नेत्यांनी देशात व्हीआयपी संस्कृतीला चालना दिली आहे. मात्र, काही नेते असे आहेत जे साधी राहणीमान ठेवत कसलाही गाजावाजा न करता लोकप्रतिनिधी म्हणून आपले काम करत असतात. नितीन गडकरी (Nitin gadkari) हे त्यातीलच एक नेते आहेत, हे आता अनेकांना वेगळं सांगण्याची गरज नाही.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे तर त्यांच्याविषयीचे हे मत अजूनच ठाम होणार आहे. विमानतळावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin gadkari Viral Video) सर्वसामान्य लोकांप्रमाणे विमानात बसण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून येत (Nitin gadkari stands in queue) आहे. या व्हिडिओतून त्यांचा साधेपणा दिसून येत आहे.

नवनीत मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. गडकरी हे विमानाच्या पायऱ्या चढत असताना हा व्हिडिओ बनवला आहे. विमानात आत बसलेल्या एकाने काचेतून हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

हेे वाचा - रात्री 2 वाजता घरात शिरून कॉन्स्टेबलचा महिलेवर Rape; रंगेहाथ सापडल्यानं नातेवाईकांनी बेदम चोपलं

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे विमान प्रवास करण्यासाठी रांगेत उभारलेले केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी असे या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हायरल व्हिडिओ असल्यामुळे ते नेमके कुठून कोठे प्रवास करत आहेत हे समजू शकलेले नाही.

First published:

Tags: Airport, Nitin gadkari