Home /News /viral /

OMG! कासवाचा हा VIDEO पाहून नेटिझन्स थक्क; असं काही केलं की डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही

OMG! कासवाचा हा VIDEO पाहून नेटिझन्स थक्क; असं काही केलं की डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही

याआधी तुम्ही कासवाला असं काही करताना कदाचित कधीच पाहिलं नसावं.

    मुंबई, 25 जानेवारी : कासव (Turtle video) म्हटलं की संथ गतीने चालणारा प्राणी हे आपल्याला माहिती आहे. कासवाला जमिनीवर लुटूलुटू चालताना आणि पाण्यात पोहोतानाही तुम्ही पाहिलं असेल. पण आता एका कासवाने असं काही करून दाखवलं आहे, जे पाहून प्रत्येक जण थक्क झाला आहे. कासवाकडे हेसुद्धा कौशल्य असतं का असाच प्रश्न बहुतेकांना पडला आहे (Turtle shocking video). कदाचित पहिल्यांदाच एक कासव भिंतीवर चढताना दिसले आहे (Turtle climbing walls video). कोळी, पाल यांना तुम्ही भिंतीवर पाहिलं असेल. त्यांच्याकडे नैसर्गिकरित्याच तशी क्षमता असते. त्यामुळे कोणत्याही आधाराशिवाय ते भिंतीवर राहतात. पण कासवाला उभ्या भिंतीवर चालताना कधी पाहिलं आहे का? तेसुद्धा कोणत्याही आधाराशिवाय. पण असं कास दिसलं आहे. हे वाचा - बछड्यांचा घास पळवणाऱ्या सिंहाचा 'तो' भागच...; सिंहिणींनी दिली भयंकर शिक्षा व्हिडीओत पाहू शकता एक छोटंसं कासव उभ्या भिंतीवर आहे. ते भिंतीवर चढतानाही दिसतं आहे. जणू काही त्याच्या पायाला असं काही लावलं आहे, ज्यामुळे ते भिंतीवर एकदम नीट राहलं आहे. @Yoda4ever नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. निंजा कासव असं या व्हिडीओला कॅपेशन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहे. कासव भिंतीवरही चढू शकतं, हे आपल्याला माहितीच नव्हतं, असं बहुतेक युझर्सनी म्हटंल आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Other animal, Viral, Viral videos

    पुढील बातम्या