लुइव्हिल, 25 फेब्रुवारी : एखादी व्यक्ती पोलिसांत असली की 24 तास त्यांना कार्यतत्पर रहावं लागतं. कधी कुठे कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल ते सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची खूप प्रशंसा केली जात आहे. कारण या व्हिडीओमध्ये दोन पोलिसांनी हॉटेल व्यावसायिकाला लुबाडणाऱ्या एका चोराला पकडलं आहे. हे दोनही पोलीस ऑफिसर पती-पत्नी असून नुकतच त्यांचं लग्न झालं होतं.
एक पोलिसात असणारं दाम्पत्य डिनर डेटसाठी गेले होते. दोघेही पोलीस ऑफिसर असून दोघांचही लग्न सहा महिन्यापूर्वी झालं आहे. रोमँटिक डिनर डेटवर गेले असताना त्या हॉटेलमध्ये दरोडा घालण्याचा प्रयत्न एका चोराने केला. त्याने रिसेप्शनिस्टला धमकावत पैसे लुटून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या या पोलीस दाम्पत्याने या चोराचा पाठलाग केला आणि हॉटेल व्यवसायिकाचं होणारं मोठं नुकसान टळलं. त्यांनी नुसता त्या चोराचा पाठलाग केला नाही तर तो हातात येईपर्यंत त्याचा पाठलाग केला. या चोराला त्यांनी अटक केली आहे.
अमेरिकेतील लुइव्हिल (Louisville) याठिकाणचा या व्हिडीओ आहे. लोएविल मेट्रो पोलिसांनी हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्याला आतापर्यंत 667 हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. पोलीस दाम्पत्याच्या साहसाचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे. 'Wrong place at the wrong time. Way to go, Officers' अशा कमेंट एकाने केली आहे तर काहींनी 'ऑफिसर्स, खूप छान काम केलं' अशी कमेंट केली आहे.
चेस आणि मॅककेऑन या दोघंही पोलीस ऑफिसर आहेत. त्यांचं सहा महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. ते दोघंजणं रोमँटिक डिनर डेटवर गेले असताना ही घटना घडली. हॉटेलमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Goes viral